Palghar beach is a treasure trove of rare species of fish

पाखरू मासा,  रेड टूथ ट्रिगर फिश या  पाठोपाठ आता फेदर स्टार हा मासा आढळून आल्याने जैव विविधतेने नटलेल्या या परिसरविषयी मत्स्य अभ्यासकामध्ये कुतूहलता निर्माण झाली आहे.

पालघर : मागील आठ दिवसापासून वाढवण समुद परिसरात कधी ही न पाहिलेले दुर्मिळ प्रजातीचे मासे आढळणाचे सत्र सुरूच आहे. पाखरू मासा,  रेड टूथ ट्रिगर फिश या  पाठोपाठ आता फेदर स्टार हा मासा आढळून आल्याने जैव विविधतेने नटलेल्या या परिसरविषयी मत्स्य अभ्यासकामध्ये कुतूहलता निर्माण झाली आहे. वाढवण परिसरातील काही तरुणांना तेथील खडकाळ भागात हा मासा आढळून आला आहे.

फेदर स्टार

हा तारा माशांच्या कुळातील एक प्रकार आहे. तारा मासे जमिनीवर खडकाळ भागावर चालतात. तर फेदर स्टार सारखे त्यांचे भाऊबंद जीवनाच्या सुरुवातीला एखाद्या खडकाला फुलाच्या देठा प्रमाणे असलेल्या पायाने चिकटून वाढतात. आणि काही पूर्ण वाढ झाल्यानंतर दगडापासून विलग होऊन पोहू लागतात तर काही दगडाला च चिटकून राहतात. दिसायला अगदी लिलीच्या फुलाप्रमाणे असल्यामुळे त्यांना ग्रीक भाषेत क्रिनॉइड असे देखील म्हणतात. क्रिनोईड शब्दाची फोड केल्यास क्रिनो म्हणजे लीली आणि ऑइड म्हणजे सारखे. थोडक्यात लीलीच्या फुला सारखे दिसणारे.

हा प्राणी पंखा सारखे असलेले त्याचे दहा हात पाण्यात वर खाली करत पोहत राहतो. आणि प्रत्येक हाताला एक चिकट केसासारखा अवयव असतो. ज्याचा उपयोग पाण्यातील पोषक तत्वे जमा करण्यासाठी केला जातो. सर्व भुजांच्या मध्यभागी त्याचे तोंड असते आणि तोंडा शेजारीच गुद्दवार असते. एखादा भक्षक मागे लागल्यास एखादी भुजा तोडून हा प्राणी पळून जातो.आणि तुटलेली भुजा पुन्हा वाढवू शकतो. अश्या प्रकारे आपला प्रतेक तुटलेला हात पुन्हा निर्माण करण्याची अद्भुत क्षमता ह्या प्राण्यांमध्ये असते. एवढच काय सगळ्या भुजा तुटल्या नंतर देखील केवळ देठा सारख्या त्याच्या अवयवा पासुन सर्व भुजा निर्माण करण्याची अद्भुत क्षमता ह्या जिवात असते.

असे एका मागून एक अद्भुत जीव राहत असलेलं वाढवण शंखोदर जिथे प्रभू श्री रामाने महाराजा दशरथ यांचे पिंडदान केले ते रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण बंदर बनवून या अशा लाखो अद्भुत जीवांना नष्ट करून बंदर प्रकल्प नाही प्रकोप येऊ पाहत आहे. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.