dj maker students of palghar

सफाळे कर्दळपाडा भागातील जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेचा अवलंब करत शाळेत ब्लूटूथ डीजे स्पीकर(bluetooth dj speaker from waste material बनविण्याचा आगळा वेगळा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

    नवीन पाटील ,पालघर: पालघर(palghar) तालुक्यातील सफाळे कर्दळपाडा भागातील जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेचा अवलंब करत शाळेत ब्लूटूथ डिजे स्पीकर(bluetooth dj speaker from waste material बनविण्याचा आगळा वेगळा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

    जिल्हा परिषद शाळा कर्दळ केंद्र सफाळे येथील इयत्ता सातवीच्या वर्गातील विशाल दिवे आणि हर्षद राजापकर या कर्दळ डोंगरी पाड्यावर राहणाऱ्या मध्यमवर्गीय दोन अवलिया विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात अनेक छोटे-छोटे यशस्वी विज्ञान प्रयोग केले आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनी मिळून टाकाऊपासून टिकाऊ संकल्पने अंतर्गत एक दर्जेदार ब्लूटूथ डिजे स्पीकर बनवून दाखविला आहे. हा प्रयोग पाहताना सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत.

    हर्षद आणि विशाल यांनी शाळेतील चार वर्षापासून बंद असणाऱ्या स्पीकरला वायरिंग करत ते स्पीकरही चालू केले आणि त्याला ब्लूटूथ जोडले. त्यामुळे ब्ल्यूटूथचा प्रयोग यशस्वी  झाला. याबाबत केंद्रप्रमुख कुंदा संखे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे विशेष कौतुक केले. त्या दोघांनी खराब आणि टाकाऊ असलेल्या ब्लुटूथचे डिव्हाइस घेतले. स्पीकरच्या गोलाकार भागाचा उपयोग यासाठी केला. कंपास गोलचा वापर केला. घरातील सुरीचाही वापर केला.

    शाळेतील शिक्षक आणि मित्रांनी यासाठी मदत केली. साहित्य मिळाल्यावर दोन दिवसात त्यांनी हे तयार केले. असेच डिवाइस बनून शाळेला देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मोबाईलमधल्या बऱ्याच गोष्टी कवितेच्या माध्यमातून मुलांना शिकवता येणार आहे. अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध झाल्यास यूट्यूबच्या मदतीने नवनवीन शोध लावण्याच्या प्रतीक्षेत हे दोघे आहेत. त्यासाठी परिसरातील दानशूर व्यक्तिमत्त्वांनी सहकार्य केल्यास या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत होईल.