कुपोषणमुक्तीसाठी पालघर जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरु, रावबणार ‘ही’ योजना

कुपोषणमुक्तीसाठी(malnutrition) पालघर जिल्हा (palghar district)परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. कुपोषणमुक्त अंगणवाडी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.

पालघर: कुपोषणमुक्तीसाठी(malnutrition) पालघर जिल्हा (palghar district)परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. कुपोषणमुक्त अंगणवाडी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यात  जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा मानस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम कालीमठ यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत व्यक्त केला.

जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कुपोषणमुक्तीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. विविध विभागाच्या समन्वयाने अंगणवाडीमध्ये कुपोषणमुक्तीसाठी केल्या जाणाऱ्या उपायोजनानंतर जी अंगणवाडी कुपोषण मुक्त होईल अशांना सन्मानित केले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांनी कुपोषण निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही सालीमठ यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यामध्ये सर्व तालुका मिळून तेरा प्रकल्प असून १०३ बीट आहेत. प्रत्येक बीट निहाय सरासरी २५ अंगणवाडी केंद्र कार्यरत असून एकूण ३१८३ अंगणवाडी केंद्रे आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्प पालघरमध्ये सॅम व मॅम मुक्त बीटची संख्या ३, मनोर -४, डहाणू-१ वसई १ असे एकूण १ बीट आहेत. परंतु सॅम नसणारी व मॅम श्रेणीमध्ये असणारी बीटची संख्या ३४ इतकी आहे. ५ बालके सॅम श्रेणी मध्ये असणारी बीट ४४ इतकी आहेत .

जिल्हा कुपोषणमुक्त करायचा असल्यास सॅम मॅम मुक्त अंगणवाडी केंद्र व सॅम मॅम मुक्त अंगणवाडी प्रभाग राबवण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून काम करता करता जिल्ह्यातील अनेक कुटुंबे स्थलांतरित होत असताना ज्या ठिकाणी स्थलांतरित होतील त्या जवळच्या अंगणवाडीमध्ये बालकांना सुविधा उपलब्ध करून देऊन आरोग्य शिबिरे लावण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेअंतर्गत ज्या पालकांनी एक वा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास त्यांना अनुक्रमे रु. पन्नास हजार व रु. पंचवीस हजार देण्यात यावे. अंगणवाडी निहाय पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याकरता जल जीवन मिशन अंतर्गत सर्वांनी प्रयत्न करावे,अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.

विविध विभागांशी समन्वय साधून कुपोषण मुक्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रयत्न सुरू आहेत. या बैठकीवेळी पालघर जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार उपस्थित होते.