earthquake affected people

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात २०१८ पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी दोन महिने भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यातील काही गावांसह आजूबाजूच्या भागातील नागरिक सध्या कोरोनाच्या भीतीसह भूकंप संकटाच्या दुहेरी कात्रीत सापडले आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात २०१८ पासून वारंवार भूकंपाचे (earthquake) शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी दोन महिने भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

परंतु गेल्या आठवडा भरा पासून ह्या भागातील नागरिकांना भूकंप धक्क्यांनी सळोकीपळो करून सोडले आहे ४ सप्टेंबर पासून भूकंप धक्क्यांनी आपलं डोकं वर काढायला सुरुवात केली असून आज पहाटे ३ वाजून ४३ मिनिटांपासून पुन्हा सौम्य व मध्यम स्वरूपाचे लगातार जवळपास ६ धक्के बसले आहेत. या मध्ये २.२ क्षमते पासून ४.४ मॅग्नेट्युड च्या धक्क्यांची नोंद सिसमोलॉजी वर झाली आहे. कोरोनाचा लॉकडाऊन काळात नागरिकांना भूकंपाने काहीसा दिलासा दिला होता मात्र आत्ता पुन्हा भूकंपाचे हादरे बसू लागल्याने नागरिक पुन्हा भीतीच्या छायेखाली आले आहेत.

डहाणू, तलासरी ,दापचरी,बोर्डी,आंबोली,धानीवरी,कासा,चिंचणी,घोळवड,शिसने आणि आजूबाजूच्या परिसरात २.२ ते ४.४ मॅग्नेट्युड क्षमतेचा धक्क्याची नोंद नेशनल सिस्मोलॉजिस्टिक सेंटर मध्ये झाली आहे. आता पर्यंत झालेल्या भुकंप धक्क्यांनी अनेक घरांच्या भिंती खिळखिळ्या झाल्या असून काही घरांच्या भिंती पडल्याही आहेत. त्यामुळे धक्के सुरू झाले की भीती पोटी येथील नागरिकांना संपूर्ण रात्र घराबाहेर काढावी लागते

सध्या पालघर प्रशासन कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात गुंतले असून पुन्हा भूकंप सत्र सुरू झालं असल्याने या भागाकडे कसे लक्ष पुरविते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.