palghar tahsildar action on illegal building

अनधिकृत बांधकामाची(illegal building) माहेरघर म्हणून बोईसर (boisar)भाग ओळखला जातो. पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांनी अचानकपणे या अनधिकृत बांधकामावर हातोडा(action on illegal building) फिरवल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

पालघर: अनधिकृत बांधकामाची(illegal building) माहेरघर म्हणून बोईसर (boisar)भाग ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे या भागात होत आहेत. काही ठराविक बांधकामावर जुजबी कार्यवाही करण्यात येत असल्याचे पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांना समजल्यावर त्यांनी अचानकपणे या अनधिकृत बांधकामांवर हातोडा(action on illegal building) फिरवल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

रात्री उशिरापर्यंत भीमनगर मोनिका गल्ली अवधनगर येथील सरकारी जागेवरील नव्याने बांधण्यात आलेली बांधकामे तोडण्यात आली. ही कारवाई लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडली होती. लॉकडाऊन खुले झाल्यावर तहसीलदार शिंदे यांच्या आदेशाने दोन इमारती पाडण्यात आल्या होत्या. मंगळवारी सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. पहिला हातोडा शुक्ला कंपाउंड त्यानंतर भीमनगर मोनिका गल्ली अवधनगर येथील सरकारी जागेवरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या दोन मजली आणि तीन मजली इमारतींच्या अनधिकृत बांधकामावर पडला. ही कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

बोईसर परिसरात शेकड्याने अनधिकृत इमारती उभ्या आहेत या इमारतींना महसूल खात्यातील तलाठी कोतवाल यांची मदत ही कधी उघडपणे तर कधी छुप्या पद्धतीने होत असते एवढी मोठी बांधकामे होत असताना ती सामान्य लोकांना दिसतात पण या ठिकाणाहून हे अधिकारी जात येत असतानासुध्दा डोळ्यावर पट्टी बांधून जातात का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

सर्कल व तलाठी यांनी बेकायदेशीर बांधकामाचा अहवाल दिला होता. त्या अनुषंगाने ही कारवाई केली आहे. पुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे.

- सुनील शिंदे ,तहसीलदार पालघर

यापुढेही सरकारी जागेवरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे बोईसर मंडळ अधिकारी मनीष वर्तक यांनी सांगितले. बोईसर मध्ये वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणात ही अतिक्रमणे उभी राहत असून राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने ही बांधकामे उभी राहत आहेत. तीन ते चार वर्षापूर्वी तोडलेल्या बांधकामाचे जागेवर मोठ्या प्रमाणात पुन्हा बांधकामे उभी राहत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.या कारवाईच्या वेळी तलाठी संजय चुरी, हितेश पाटील, नितीन राऊत, बिपीन पाटील प्रकाश पाटील आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.