पालघर तिहेरी हत्याकांड :  CID कडून आणखी २४ आरोपींना अटक

पालघर : गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणात सीआयडीने नव्या 24 आरोपींना अटक केली असून लवकरच डहाणू न्यायालयात हजर करणार आहेत. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या तिहेरी हत्या प्रकरणात सीआयडीने एकूण 208 आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यापैकी 50 जणांना सीआयडीने ताब्यात घेतल्याचे कळते. यापैकी 24 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना गुरुवारी डहाणू न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणात आधीपासून अटकेत असलेल्या 62 आरोपींच्या जामिनावर ठाण्यातील न्यायालयात सुनावणी होणार आहे.
बॉक्स

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी चोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या प्रकरणात आतापर्यंत सीआयडीने जवळपास 178 हून आरोपींना अटक केली आहे. यापैकी 11 आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात आला.