palghar zp meeting

गाव(village) स्तरावरील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी ‘हर घर नल से जल’ या योजनेत सहभागी होऊन गावाचा जल आराखडा(water planning) तयार करावा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा भारती कांबडी(bharti kambdi) यांनी केले आहे.

पालघर :गाव(village) स्तरावरील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी ‘हर घर नल से जल’ या योजनेत सहभागी होऊन गावाचा जल आराखडा(water planning) तयार करावा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा भारती कांबडी(bharti kambdi) यांनी केले. केंद्र पुरस्कृत जल जीवन मिशन अभियानाच्या आढावा बैठकीत  ते बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ,उपायुक्त विकास गिरीश भालेराव, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालि मठ उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमात जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी सहभागी होऊन या योजनेत सहकार्य करून योजना यशस्वी करावी असे आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केले.

ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळजोडणी द्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.जल जीवन मिशन अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या योजना या गावातील पाण्याचे स्तोत्र पाण्याचे नैसर्गिक कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन तयार करण्यात यावे,असे केंद्राने राज्याला कळविले आहे.

सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळजोडनी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात ४ लाख १० हजार ७३३ ग्रामीण भागातील कुटुंब संख्या असून चालू वर्षात १लाख ५६ हजार नळजोडणीच्या उद्दिष्टांपैकी ४५ हजार नोंदी जलजीवन मिशनच्या संकेतस्थळावर करण्यात आले आहेत.

उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले असून याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने उद्दिष्टपूर्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. या कार्यक्रमात केवळ ग्रामीण भागातील कुटुंबांना पाणी उपलब्ध करून देण्याचा मर्यादा न ठेवता जिल्ह्यातील अंगणवाड्या शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र इत्यादी घटकांना पाणी पुरवठा करण्याचा शंभर दिवसाचे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

जल जीवन मिशनच्या कार्यरत मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ जोडणी द्वारे ५५ एलपीसीडी प्रमाणे गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.