plazma

वसई(vasai) तालुक्यात दररोज ८०० ते ९०० कोरोना रुग्ण(corona patients) वाढत चालले आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल, ऑक्सिजन बेड,रेमडेसिवीर,प्रतिबंधक लसीची कमतरता भासत असताना,प्लाझ्मा दातेही घाबरून पुढे येत नसल्यामुळे रक्तपेढ्या अडचणीत(problem of blood bank) आल्या आहेत.

  वसई: कोरोनाच्या महामारीत प्लाझ्मादाते(plazma doners are not coming for plazma donation) पुढे येत नसल्यामुळे रक्तपेढ्या आणि परिणामी रुग्णही अडचणीत आले आहेत.

  वसई तालुक्यात दररोज ८०० ते ९०० रुग्ण वाढत चालले आहेत.या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल, ऑक्सिजन बेड,रेमडेसिवीर,प्रतिबंधक लसीची कमतरता भासत असताना,प्लाझ्मा दातेही घाबरून पुढे येत नसल्यामुळे रक्तपेढ्या अडचणीत आल्या आहेत.

  रुग्ण मित्र राजेंश ढगे,राष्ट्रीय स्वयंसेवक,विश्‍व हिंदु परिषद आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्लाझ्मा दात्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी प्लाझ्मा मदत कक्ष सुरु केला आहे.  प्लाझ्मादात्यांनी कोरोना झाल्याची तारीख,दात्यांची परिस्थिती, कोरोना पॉझिटीव्ह टेस्ट रिपोर्ट पाठवावा. दात्यांना कोरोना झाल्यानंतर ४२ दिवसांनी प्लाझ्मादान करता येईल. त्यांचे वय १८ ते ६० दरम्यान आणि वजन ५५ किलोच्यावर असावे,असे ढगे यांनी नमुद केले आहे. स्वयंसेवक दात्यांच्या घरी येवून त्यांचे नमुने घेवून जातील, असे स्पष्ट केले.

  तालुक्यात गेल्या वर्षभरात ३० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण बरे होवून घरी परतले.त्यांच्याकडून प्लाझ्मा घेता आला असता,मात्र प्लाझ्मा म्हणजे काय तो दिल्यावर आपल्यावर काही परिणाम होतो का ? याबाबत जनजागृती न करण्यात आल्यामुळे कोरोनामधून बरे झालेले रुग्ण अशाप्रकारचे दान करण्यास पुढे येत नाहीत.त्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे.

  - राजेश ढगे,प्लाझ्मा दाते,रुग्णमित्र

  कोरोना रुग्णांना प्लाझ्माची अत्यंत आवश्यकता असते.कोरोनामधून पुर्णतः बरे झालेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असते.अशा लोकांनी केलेले प्लाझ्मादान अत्यंत उपयुक्त ठरते.कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत अमेरिकेत जितके रुग्ण ९० दिवसात झाले होते.तितके रुग्ण भारतात फक्त १५ दिवसांत झाले. त्यामुळे सर्व वैद्यकीय आणि प्रशासकिय व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. रुग्णांवर मोठे संकट आले आहे.त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी आपल्या कुटुंबातील, शेजारी, नातेवाईक किंवा परिचयातील व्यक्ती कोरोनातून बरे झाली असतील तर त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार करावे.

  प्लाझ्मादानासाठी कुंदन खंडागळे-८७८८४४१०३१,अभिषेक दुबे-८२०८८०११०३ किंवा अभिजीत-७७०९८६३०१६ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.