tungareshwar waterfall

१४ जुनपासून लॉकडाऊन शिथील करण्यात येणार असल्याचे १२ जुनला जाहीर झाल्यानंतर घरात बांधून राहिलेले पर्यटक(Tourist On Waterfall) मोकाट सुटले.त्यांनी शनिवारी सकाळी तुंगारेश्‍वर धबधब्याजवळ(TungareshwarWaterfall) थेट धाव घेतली.

  वसई: लॉकडाऊनला(Lockdown) धबधब्यात(Waterfall) बुडवून मनसोक्त धांगडधिंगा घातल्यानंतर शेकडो पर्यटक घरी परतल्यानंतर वनविभाग आणि पोलीसांचे कारवाईचे घोडे वरातीमागून धावले आहेत.

  १४ जुनपासून लॉकडाऊन शिथील करण्यात येणार असल्याचे १२ जुनला जाहीर झाल्यानंतर घरात बांधून राहिलेले पर्यटक(Tourist On Waterfall) मोकाट सुटले.त्यांनी शनिवारी सकाळी तुंगारेश्‍वर धबधब्याजवळ(Tungareshwar Waterfall) थेट धाव घेतली.मुंंबई, ठाणे,वसई,मीरा-भाईंदर च्या शेकडो पर्यटकांनी धबधबे आणि नाले भरुन गेले.त्यात लहान मुले,स्त्री-पुरुष आणि जोडप्यांचाही समावेश होता.

  दिवसभर धांगडधिंगा घातल्यानंतर सायंकाळी परतताना प्लास्टीकच्या पिशव्या, मद्याच्या रिकाम्या बाटल्या,जेवणाचे कंटेनर,प्लास्टीकच्या बाटल्या त्यांनी तुंगारेश्‍वरला भेट दिल्या. शेकडो पर्यटक धांगडधिंगा घालत असताना स्थानिक पोलीस,वाहतूक पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी या ठिकाणी फिरकलेही नाही.त्यामुळे रविवारीही शेकडो पर्यटक गाड्या आणि पार्टीच्या सामानासह तुंगारेश्‍वरला धडकले. मात्र,तोपर्यंत या तिन्ही विभागाला जाग आली होती.
  पोलीसांनी बॅरीकेट्स लावून तुंगारेश्‍वरचा मार्ग रोखून धरला होता.त्यामुळे पर्यटकांना निराश होवून परतावे लागले.

  तुंगारेश्‍वर धबधब्यात बुडून दरवर्षी सरासरी दोन जणांचा मृत्यू होतो.तरीही पर्यटकांना बंदी घालणारा ठोस उपाय वनविभागामार्फत करण्यात आलेला नाही. लॉकडाऊनच्या काळातही पर्यटकांच्या घुसखोरीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. फौजदारी प्रक्रिया कलम १४४ साथरोग नियंत्रण अनिधनियमानुसार पालघर जिल्ह्यातील धबधबे, तलाव,धरणे,समुद्र किनारे या पर्यटन स्थळांच्या एक किलोमिटर परीसरात १२ जुन ते ९ ऑगस्ट पर्यंत पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्याच्या उगमस्थानी जाणे, सेल्फी काढणे,चित्रीकरण करणे,मद्यपान करणे,खाद्य पदार्थ,कचरा,प्लास्टीच्या बाटल्या फेकण्यास जिल्हाधिकार्‍यांनी मनाई केलेली असताना,या आदेशाचे पालन होण्याकरीता वनविभाग आणि वालीव पोलीसांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या.

  शनिवारचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी रविवारी तुंगारेश्‍वरला धाव घेतली.त्यामुळे पर्यटक निघून गेल्यानंतर पोलीसांचे वरातीमागून घोडे धावल्याचे दिसून आले.पर्यटकांनी कायदा मोडल्यानंतर या प्रकरणी कोणती कारवाई केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता,वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास चौघुले यांनी फोन कट केला.