coronavirus 400 500 mn vaccine doses 25 crore people july 2021 says dr harshvardhan

कोरोना लसीकरणाच्या(corona vaccination) नावाखाली लुबाडणारी(fraud) टोळी सक्रीय झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पालघर पोलिसांनी(police appeal to stay alert) केले आहे.

वसई : कोरोना लसीकरणाच्या(corona vaccination) नावाखाली लुबाडणारी(fraud) टोळी सक्रीय झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पालघर पोलिसांनी केले आहे. जगभरात लाखो लोकांचे बळी घेणार्‍या कोरोनाने वसई तालुक्यातही आठशेहून अधिक लोकांचे बळी घेतले आहेत. तर ३० हजाराच्या आसपास लोकांना या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातही भीतीचे वातावरण कायम आहे.

कोरोनावर प्रतिबंधात्मक लस येण्याची चातकासारखी वाट पाहिली जात असल्यामुळे आणि तशा लसीकरणाला सुरवात होणार असल्याची माहिती प्रसारीत झाल्यामुळे आपल्याला ही लस मिळावी यासाठी नागरिक प्रयत्नशील आहेत. हीच संधी साधून त्यांना लुबाडणारी टोळी कार्यरत झाली आहे.

कोरोना लसीच्या नोंदणीसाठी या टोळीतील सदस्य फोन करून आपला आधारकार्ड,ईमेल आयडी मागतात. त्यानंतर आधार प्रमाणित करण्यासाठी आपल्याला ओटीपी येतो. तो विचारतात.हा ओटीपी त्यांना दिल्यावर आधारकार्ड लिंक असलेल्या आपल्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जातात,अशी त्यांची गुन्ह्याची पद्धत आहे. त्यामुळे अशा फोन कॉल्सपासून सावध राहा,असे आवाहन पालघर पोलिसांनी केले आहे.