प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

भटक्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी अजब उपाय(police taking action on people) सुरू केला असून, त्यांच्या मदतीला वसई विरार महापालिकेची(vasai virar corporation) हरी पिली म्हणजेच परिवहन सेवा ही रस्त्यावर धावू लागली आहे.

    रवींद्र माने, वसई : लॉकडाऊन असतानाही विनाकारण भटकणाऱ्या नागरिकांना बसमध्ये घालून त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर दंडात्मक कारवाई(action on people roaming around) करण्याचा उपाय पोलिसांनी वसई तालुक्यामध्ये सुरू केला आहे. त्यांच्या मदतीला वसई विरार महापालिकेची(vasai virar corporation) हिरवी पिवळी बसही धावत आहे.

    कडक विकेंड लोकडाऊन आणि दररोजचा लॉकडाऊन केल्यानंतरही वसई तालुक्यात सरासरी ८०० ते ९०० च्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. नाकाबंदी करून रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी केल्यावर दवाखान्यात जातोय,स्मशानात चाललोय,आई आजारी आहे, अशी कारणे सांगून लोक सुटका करून घेत आहेत. त्यामुळे अशा भटक्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी अजब उपाय सुरू केला असून, त्यांच्या मदतीला महापालिकेची हरी पिली म्हणजेच परिवहन सेवा ही रस्त्यावर धावू लागली आहे.

    विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणारे पथक असा फलक लावून महापालिकेच्या बसमधून पोलीस सर्व रस्त्यांवर फिरत आहेत.

    रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी करून अयोग्य कारण दिसल्यास अशा नागरिकांना बसमध्ये घालून कोविड सेंटरमध्ये नेण्यात येत आहे. तिथे त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर दंडात्मक कारवाईही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

    पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल या भीतीने अनेक नागरिक स्वतःची तपासणी करून घेत नाहीत आणि विनाकारण रस्त्यावर भटकत असतात. ही बाब हेरून पोलिसांनी अशाप्रकारे कार्यवाही करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण भटकल्यास कोरोना चाचणी आणि पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.त्यातून चांगलेच फलित मिळेल अशी अशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.