rusticated police

विकास पष्टे हा वसई (vasai)पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचा ओंडर्ली (रायटर) म्हणून कर्तव्यावर होता. तर स्नेहल पाटील ही लेखनिक अंमलदार यांना मदतनीस म्हणून कार्यरत होती. या दोघांचे प्रेमसंबंध(police in relationship) असल्याचा संशय स्नेहलचे पती(husband got murdered by wife) पुंडलिक पाटील यांना आल्यानंतर ते वारंवार स्नेहलकडे याबाबत विचारणा करत होते.

    पालघर:अनैतिक संबंधातून प्रियकरासोबत मिळून पतीलाच जीवे ठार मारणाऱ्या महिला पोलिसासह तिच्या पोलीस प्रियकराला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या गुन्ह्यात दोघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विकास पष्टे व स्नेहल सुधाकर पाटील अशी या आरोपी पोलिसांची नावे आहेत. स्नेहल व विकासने अन्य तिघांना सुपारी देऊन स्नेहलचा पती रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांची हत्या घडवून आणली होती.

    याबाबत अधिक माहिती अशी की, विकास पष्टे हा वसई पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचा ओंडर्ली (रायटर) म्हणून कर्तव्यावर होता. तर स्नेहल पाटील ही लेखनिक अंमलदार यांना मदतनीस म्हणून कार्यरत होती. या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय स्नेहलचे पती पुंडलिक पाटील यांना आल्यानंतर ते वारंवार स्नेहलकडे याबाबत विचारणा करत होते. पती प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने स्नेहलने विकाससोबत कट रचून तीन जणांना त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती.

    त्यानुसार, १८ फेब्रुवारी रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर-ढेकाळे गावाच्या हद्दीत पुंडलिक यांची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी कसून तपास करत प्रथम विकास पष्टेला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने संपुर्ण प्रकार पोलिसांना सांगितला . यानंतर ३ मार्च रोजी स्नेहल व या गुन्ह्यात सहभागी इतर तिघांना अटक करण्यात आली होती. सर्व अटक आरोपी अद्यापही पोलीस कोठडीत आहेत.

    दरम्यान, या गुन्ह्यातील दोन्ही पोलीस कर्मचारी शिस्तप्रिय पोलीस दलामध्ये जबाबदार पदावर कार्यरत असताना, तसेच त्यांना कायद्याचे संपूर्ण ज्ञान असतानाही त्यांनी असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची जनमाणसातील प्रतिमा मलीन झाली असून त्यांचे वर्तन पोलीस दलात अशोभनीय आहे, असे सांगत पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दोघांना सेवेतून निलंबित केले आहे.