vasai atm theft

वसई: झटपट पैसे कमावण्यासाठी होणाऱ्या गुन्ह्यात आता लॉकडाऊन आणि बेरोजगारीमुळे  भरच पडत चालली आहे. बँकेचे एटीएम तोडून(bank atm theft in vasai) त्यातले १०लाख ९० हजार अगदी सहजपणे लंपास करण्याचा चोरट्याचा डाव जरी यशस्वी झाला असला तरी २४ तासांच्या आत त्याला पकडण्यात वाळीव पोलोसांना यश आले आहे. 

वसई पूर्वेकडील फडरवादी येथे एका बँकेचे एटीएम गेले काही दिवस बंद होते. स्थानिकांनी अशी माहिती दिली की, एका इसमाने एटीएम रिपेरिंगच्या बहाण्याने आतमध्ये प्रवेश केला आणि कोणालाही त्याचा संशय आला नाही.मात्र एटीएम बाहेरून जरी तोडले तरी आतमध्ये ज्या उपकरणात पैसे ठेवले असतात त्याला उघडण्यासाठी पासवर्ड लागतो, तो आरोपीने वापरला आणि इथेच त्याची ओळख पटली.

एटीएमला पैसे पुरवण्याचे काम करण्यासाठी बँक नेमही एखाद्या एजन्सीला देते. एटीएम फोडून पैसे चोरण्याचा डाव त्याच एजन्सीमधील, दोन महिन्यांपूर्वी काम सोडलेल्या इसमाने केल्याचा दावा वाळीव पोलीस करत आहेत. याचे मूळ कारण म्हणजे पैसे काढण्यासाठी वापरण्यात आलेला पासवर्ड. दुर्दैवाने काही दिवसांपूर्वीच एटीएमच्या आतील सीसीटीव्हीचे रिपेरिंग करण्यासाठी काढून नेलेले होते. आरोपीने शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बंद एटीएमच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि पैसे चोरले. पासवर्ड माहीत असेल त्याच कामगाराने चोरी केल्याचा पोलिसांना संशय आला. या अनुषंगाने पोलिसांनी तपासला सुरुवात केली आणि हा आरोपीने काही महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती.

पोलिसांनी त्याच्या घरी धाड मारल्यावर आरोपीच्या घरातून पोलिसांना चोरी केलेले १० लाख ७० हजार रुपये पोलिसांना सापडले असून ते कंपनीच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपी फरार झाला असून वालीव पोलिसांच्या ३ ते ४ टीम त्याच्या मागावर आहेत.