Increased electricity bill MNS signature campaign spontaneous response of citizens

मनसैनिकांना(MNS) शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या पोलीस निरिक्षकाला(police inspector) सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारचे आंदोलन(mns protest) स्थगित करण्यात आल्याचे मनसेने जाहीर केले आहे.

वसई :  मनसैनिकांना(MNS) शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या पोलीस निरिक्षकाला(police inspector) सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारचे आंदोलन(mns protest) स्थगित करण्यात आल्याचे मनसेने जाहीर केले आहे. मात्र असे असले तरी पालिका आयुक्त आणि मनसेच्या वादात एक पोलीस अधिकारी भरडला जात असल्याचे गेल्या आठवडाभराच्या घटनांमधून स्पष्ट झाले आहे. तरीसुद्धा ही सक्तीची रजा आहे की ते स्वतः रजेवर गेले आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरण डी यांना भेटण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी अनेकदा प्रयत्न केल्यानंतर कोरोनामुळे फक्त एकाच पदाधिकार्‍यांना भेटता येईल, असा आदेश गंगाथरण यांनी दिला होता. तत्पुर्वी शिवसेनेच्या सात-आठ पदाधिकाऱ्यांना एकाच वेळी आयुक्तांनी भेट दिली होती. आयुक्तांच्या या भेदभावामुळे दुखावलेल्या मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी आयुक्तांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे जाधव यांच्यावर पोलीस कारवाईही झाली होती.त्यामुळे मनसेच्या संतापात आणखीनच भर पडली होती. त्यानंतर परिवहन सेवेच्या निमित्ताने आयुक्त वसईच्या एव्हरशाईन मैदानात येणार होते. तिथे त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न जाधव आणि त्यांच्या सैनिकांनी केला.

मात्र पोलिसांनी त्यांना वसई न्यायालयाच्या परिसरात थोपवून धरले होते.तरीदेखील कडेकोट बंदोबस्तात झालेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी दोन मनसैनिकांनी प्रवेश मिळवून आयुक्त साहेब भेट द्या अशा घोषणा दिल्या. त्यावेळी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,खासदार राजेंद्र गावित,आमदार रविंद्र फाटक असे दिग्गज उपस्थित होते.त् यांच्यासमोर पोलीस निरिक्षक राजेंद्र कांबळे यांनी अतिरीक्त कर्तव्य दक्षता दाखवून त्या दोन मनसैनिकांच्या गचांड्या धरले.इतके करूनही ते थांबले नाही.एखाद्या सराईत गुन्हेगारांप्रमाणे त्या मनसैनिकांना शिवीगाळ करून कांबळे यांनी बेदम मारहाण केली.

आपण मंत्र्यांसमोर कर्तबगारी दाखवली अशा थाटात असणार्‍या राजेंद्र कांबळे यांनी पुन्हा दुसरी चूक केली. झाल्या प्रकाराचा जाब विचारायला तुळींज पोलीस ठाण्यात आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी धमकावून अविनाश जाधव यांना अरेरवी करून आत टाकण्याची धमकी दिली.त्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी कांबळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेवून कांबळे यांनी आई-बहिणीवरून शिव्या दिल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व महिला सैनिक तुळींज ठाण्यावर आंदोलन करतील असा इशारा दिला.

या इशार्‍याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना,प्रहार, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कांबळे यांच्यावर कारवाई केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा दिला.अखेर राजेंद्र कांबळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे तसेच त्यांची सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आश्‍वासन पोलीस आयुक्तांनी दिल्यामुळे मनसेने आपले आंदोलन तात्पुरते स्थगीत करण्यात आल्याचे आविनाश जाधव यांनी जाहीर केले आहे.

कांबळे स्वतःहून रजेवर गेले असतील तर ते चांगलेच आहे. त्यांच्यावर कारवाई होऊ नये, अशीच आमची भूमिका आहे. मनसेने आंदोलन मागे घेतले असे जाहीर केले आहे. त्यामुळे आमचेही आंदोलन होणार नाही.

- शिरीष चव्हाण,माजी जिल्हाप्रमुख शिवसेना

मुजोर आयुक्त विरुद्ध मनसे असा लढा सुरु होता.त्यात अनपेक्षितपणे राजेंद्र कांबळे यांनी उडी घेतली त्यात ते भरडले जात आहेत.
कांबळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे अविनाश जाधव यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केले असले,तरी कांबळे दोन दिवस स्वतः रजेवर गेल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी सत्यता जाणून घेण्यासाठी पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी कॉल न घेता मिटींगमध्ये असल्याचा मेसेज पाठवला.तर अविनाश जाधव,जयेंद्र पाटील यांच्याशी वारंवार संपर्क केला असता,त्यांनी तसदी घेतली नाही.मनसेचे आंदोलन स्थगीत झाल्यामुळे शिवसेनेनेही आपले आंदोल मागे घेतले आहे.राजकिय दबावाखाली कांबळेंवर कारवाई केल्यास मनसेच्या मोर्च्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेद्वारे मोर्चा काढण्यात येणार होता.