vikramgad potholes

विक्रमगड: विक्रमगड ते जव्हार या राष्ट्रीय महामार्गावर(vikramgad to jawhar highway) विक्रमगड सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती यांच्या अगदी समोर रस्त्यावर भलेमोठे खड्डे(potholes) पडले असून यात साचलेल्या पाण्यामुळे लोकांना तळ्यातून जात असल्याचा अनुभव येत आहे.

विक्रमगड: विक्रमगड ते जव्हार या राष्ट्रीय महामार्गावर(vikramgad to jawhar highway) विक्रमगड सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती यांच्या अगदी समोर रस्त्यावर भलेमोठे खड्डे(potholes) पडले असून यात साचलेल्या पाण्यामुळे लोकांना तळ्यातून जात असल्याचा अनुभव येत आहे. विक्रमगड मुख्य बाजार पेठेतही रस्त्याची हीच अवस्था असून सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खड्डे अधिक मोठे झाले असून याचा लोकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चार चाकीला चांगलीच कसरत करावी लागते तर दुचाकी चालविणे म्हणजे धोक्याचे झाले आहे. बांधकाम विभाग ते विक्रमगड बाजारपेठ या भागात असंख्य खड्डे पडले असून हे दरवर्षीचे दुखणे आहे, या भागात काँक्रीटीकरण करावे व तात्काळ या महत्त्वाच्या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी राहुल मोरे यांनी केली आहे.