naka kamgar

कोरोनामध्ये(corona) आपल्या मूळ गावी गेलेला मजूर(labor) वर्ग पुन्हा एकदा आपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागला आहे. त्यामुळे बंद पडलेली कामे हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र सगळ्याच मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे त्यांच्यापुढे जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालघर : कोरोनामध्ये(corona) आपल्या मूळ गावी गेलेला मजूर(labor) वर्ग पुन्हा एकदा आपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागला आहे. त्यामुळे बंद पडलेली कामे हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र सगळ्याच मजुरांच्या हाताला(u काम मिळत नसल्यामुळे त्यांच्यापुढे जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाका मजुरी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड,मध्यप्रदेशमधील झाबुवा त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विक्रमगड जव्हार मोखाडा या ग्रामीण भागातील मजुरांनासुद्धा रोजंदारीसाठी झटावे लागत आहे. पालघर स्टेशन परिसरात उभे राहणारे नाका कामगार सकाळी सात वाजल्यापासून त्यांना कामासाठी घेऊन जाणाऱ्या ठेकेदार मंडळीची वाट बघताना दिसतात. साधारण सकाळी ८: ३०पर्यंत सर्व मजूर आपल्या कामाच्या जागेवर पोहोचतात पण सध्या कामाचे प्रमाण कमी असल्यामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत स्टेशनबाहेर नाक्यावर उन्हातानात ठेकेदारांची प्रतीक्षा करताना मजूर दृष्टीस पडतात.

पालघर व परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू होती करोना काळात मजूर उपलब्ध नसल्यामुळे ती ठप्प पडली होती. आत्ता कुठे ती हळूहळू सुरू होताना दिसत आहेत.बऱ्याच नाका कामगारांना दोन-तीन दिवस हाताला काम मिळत नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे. दर दिवशी मागणी असलेल्या नाका कामगारांना त्यातही पुरुष वर्गाला दिवसाला पाचशे रुपये तर महिला वर्गाला चारशे रुपये मिळतात पण सध्या काम कमी असल्यामुळे वेळेवर शेवटी पोटासाठी ज्या दरात काम मिळेल त्या दरात काम करण्याची आमची तयारी असल्याचे बिहारमधून आलेल्या कामगारांनी सांगितले. नाका कामगारांना शासनाकडून काहीच मदत मिळत नाही. वर्षानुवर्षे सकाळी नाक्यावर उभा राहणारा या कामगारास कोणीच वाली नसल्याने त्यांची उपेक्षा होत आहे.