jawhar meeting

मोखाड्यातील(mokhada) मध्य वैतरणा धरण प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या प्रवेशद्वारावर २३ जानेवारीला ठिय्या आंदोलन केले होते. त्याची दखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांनी घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार  शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांनी कोचाळे गावात जाऊन प्रकल्प ग्रस्तांची भेट घेऊन चर्चा केली.

जव्हार :  मोखाड्यातील(mokhada) मध्य वैतरणा धरण प्रकल्पग्रस्तांनी(vaitarna dam project affected ) अपूर्ण नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करावी.तसेच महापालिकेने गाव दत्तक घ्यावी. प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाची वीज मोफत मिळावी. प्रकल्पग्रस्त दाखले मिळावेत. जलविद्युत प्रकल्पाला क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव द्यावे इत्यादी मागण्यांसाठी धरणाच्या प्रवेशद्वारावर २३ जानेवारीला ठिय्या आंदोलन केले होते. त्याची दखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांनी घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार  शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांनी कोचाळे गावात जाऊन प्रकल्प ग्रस्तांची भेट घेऊन चर्चा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मी प्रकल्पग्रस्तांची कोचाळे येथे जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच तातडीने या बाबतचा संदेश मुख्यमंत्र्यांना देखील पाठवला आहे. येत्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊन या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविणार आहोत. तसेच या समस्यांबाबत नगरविकास मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली आहे.

- रविंद्र फाटक, आमदार व शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख

यावेळी तुमचे एक शिष्टमंडळ घेऊन आपण स्वतः तुमची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवुन आणू आणि तुमच्या समस्या सोडवू, असे आश्वासन फाटक यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले. त्यामुळे प्रकल्प ग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.      यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, तालुका प्रमुख अमोल पाटील यांसह देवराम कडु, गोपाळ ठोंबरे, भाऊराव ठोंबरे स्थानिक सरपंच, उपसरपंच तसेच अनेक प्रकल्प ग्रस्त व स्थानिक ग्रामस्थ ऊपस्थित होते.