Progressive farmers in Vasai concrete forest

कुटुंबियातील सदस्यांनी देखील यासाठी हातभार लावला. मेहनत करत पीक लागवड यशस्वी केली पेंढा देखील मिळाला तर भात तयार झाल्यावर त्यातून ८०० किलो तांदूळ पिकवले. तांदळाला प्रति किलो ५५ रुपये दर मिळाला असून ३५० पेंढ्याचे भार तयार झाले एका पेंढ्याच्या भाराला ३५ ते ४० रुपये बाजारात भाव मिळाला आहे.

वसई : पावसामुळे भातशेती लागवडीची वाताहत झाली असतानाच वसईच्या एका शेतकऱ्याने (Progressive farmers in Vasai ) मात्र एक एकर जमिनीवर भात लागवड प्रयोग यशस्वी करून सुमारे ८०० किलो तांदूळ पिकवला (rice and paddy on acreage) आहे. या प्रगतीशील शेतकऱ्याला त्यातून चांगले उत्पन्न मिळाले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रात शेतीची प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असून सरकारने मदत करावी अशी हाक शेतकरी राजाने दिली आहे. त्यातच वसई येथील शेतकरी भूपेश कडुलकर यांनी त्यांच्या एक एकर जमिनीवर भात लावले यासाठी त्याने १४० दिवसाचा प्रयोग केला. बियाणे ,पेरणी , आवणी , कापणीसाठी मेहनत घेतली.

कुटुंबियातील सदस्यांनी देखील यासाठी हातभार लावला. मेहनत करत पीक लागवड यशस्वी केली पेंढा देखील मिळाला तर भात तयार झाल्यावर त्यातून ८०० किलो तांदूळ पिकवले. तांदळाला प्रति किलो ५५ रुपये दर मिळाला असून ३५० पेंढ्याचे भार तयार झाले एका पेंढ्याच्या भाराला ३५ ते ४० रुपये बाजारात भाव मिळाला आहे.

कडुलकर यांची जमीन शहरात आहे आणि आज सोन्याचा भाव असून देखील ती विक्री न करता त्यावर नवनवीन प्रयोग करत भात शेतीसह विविध भाज्यांची लागवड केली असून, बाजूलाच असणाऱ्या बावखलाचे देखील त्यांनी संवर्धन केले आहे हे विशेष म्हणावे लागेल.

सिमेंट काँक्रीटचे जंगल वाढत असताना शेती जपण्याचा प्रयत्न कडुलकर कुटूंबीय करत असल्याने प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

यंदा लागवड केलेल्या भातातून चांगले उत्पन्न मिळाले आहे, पावसाचा विपरीत परिणाम शेतीवर झाला नाही तर तांदूळ उत्तम झाले तसेच पेंढा देखील चांगल्या प्रकारे मिळाला आहे. लॉकडाऊन मध्ये शेतीत उगवलेल्या भातामुळे आर्थिक फायदा झाला. '

- भूपेश कडुलकर - शेतकरी , वसई