पालघर जिल्ह्यामध्ये मनाई आदेश लागू

वरील आदेशातून वसई तालुक्याला वगळण्यात आले आहे फौजदारी प्रक्रिया संहिता१९७३ च्या कलम १४४ (२) अन्वये आधीच काढण्यात आली असून सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

    पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये दि ५ एप्रिल ते दि ३० एप्रिल २०२० पर्यंत सायंकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुरसळ यांनी परिपत्रक काढले आहे.

    वरील आदेशातून वसई तालुक्याला वगळण्यात आले आहे फौजदारी प्रक्रिया संहिता१९७३ च्या कलम १४४ (२) अन्वये आधीच काढण्यात आली असून सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील 51(b), भारतीय दंड संहिता ( 45 ऑफ 1860) च्या कलम १८८ व साथ रोग नियंत्रण अधिनियमन १८९७ आणि या संदर्भात तील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी परिपत्रकात कळविले असून त्या आदेशाची अंमलबजावणी आज रात्री आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे.