वाडा – पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अॅमेझॉन जंगल असल्याचे प्रतय येत असल्याचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोखाडा येथील सूर्यमाळ या ठिकाणी ते भेटीदरम्यान बोलत होते. त्यांनी यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत या भागाचा  दौरा करून येथील पर्यटन विकास साधला जाईल. तसेच या भागात लीची, स्ट्रॉबेरी, आणि आंबा उत्पादन घेण्याचे प्रयत्न होईल. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ या निसर्गाच्या सान्निध्यात येऊन त्यांनी या परिसराची निसर्ग सौंदर्य पाहिली. त्यानंतर ही जागाच पसंत पडल्याचे त्यांनी यावेळी बोलताना आपल मत व्यक्त केले.

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ हा निसर्ग सौंदर्य बहरलेला असतो. येथील बहुतांशी लोक रानमेवा, रानभाज्या विक्रीसाठी वाडा तालुक्यात येत असतात. त्याच वनौषधी हाड सांधण्यासाठी येथे औषध मिळते आणि ते येथील परिसरात प्रसिद्धीस आहे. अशा वनसंपदने नटलेला परिसर हा येथे येणाऱ्या पर्यटकाला भुरळ घालणारा आहे. 

या दौऱ्यात त्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोव्हिड-१९ बाबतचा आढावा घेऊन त्यांनी पालघर जिल्ह्याभरात पालघर व वसई ग्रामीण येथे रुग्णांचे प्रमाण तुलनेने जास्त असून वसई व पालघरमधील औद्योगिक वसाहती, रहदारी या गोष्टी त्यास कारणीभूत असून, पालघर जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील हिरवळ, स्वच्छ हवा, प्रदूषण विरहित हवामान,  भरपूर प्रमाणात मिळणारा ऑक्सिजन यामुळे हे प्रमाण कमी असावे असे डॉ. आव्हाड यांनी सांगितले. यावेळी विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोना आढवाबाबत बोलताना त्यांनी औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात असून औषधाच्या बाबतीत पालघर स्वयंपूर्ण आहे. नागरिकांनी ताप आणि ऑक्सिजन लेवल वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे असे सांगून कोव्हीड-१९ ची बाधा झाली. तर जनतेने घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असल्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.