महावितरण विभागाकडून आरोग्य यंत्रणेवर घाला; वीजजोडणी तोडली, अंधाराचे साम्राज्य

आंबेसरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वीज नसल्याने इतर महत्त्वाच्या सुविधांचा अभाव ही समोर आल्याने रुग्णालयात उपचारा साठी आलेल्या आदिवासी गर्भवती महिलांसह शेकडो रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या उपकेंद्रात गेल्या दीड वर्षापासून अंधारातच रुग्ण व गर्भवती महिलांवर उपचार करण्याची वेळ आरोग्य अधिकाऱ्यावर आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा विद्युत पुरवठा एक वर्षा पासून खंडित

डहाणू : डहाणू तालुक्यातील आंबेसरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे एक वर्षा पूर्वीचे वीजबिल देयक थकित झाल्याने उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता तत्तपूर्वी काही दिवसात आरोग्य उपकेंद्राकडून वीज देयक तात्काळ भरणा करून दीड वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप महावितरण विभागाकडून आरोग्य केंद्रास वीज जोडणी करण्यात आली नसल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे.

आंबेसरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वीज नसल्याने इतर महत्त्वाच्या सुविधांचा अभाव ही समोर आल्याने रुग्णालयात उपचारा साठी आलेल्या आदिवासी गर्भवती महिलांसह शेकडो रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या उपकेंद्रात गेल्या दीड वर्षापासून अंधारातच रुग्ण व गर्भवती महिलांवर उपचार करण्याची वेळ आरोग्य अधिकाऱ्यावर आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

डहाणू आरोग्य विभागा कडून आशागड महावितरण विभागाला वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही याकडे महावितरण विभागाचे कनिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आसल्याने आरोग्य अधिकाऱ्यासह ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आंबेसरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा कडून सप्टेंबर २०१९ रोजी थकित वीज देयक २२१० रुपये भरण्यात आले होते मात्र १६ महीने विद्युत देयक भरून ही आजतागायत महाराष्ट्र विद्युत विभाग आशागड कडून वीज पुरवठा जोडण्यात आलेला नाही.

त्याचबरोबर जुन्या थकित बिलाचा भरणा भरून विद्युत जोडणी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला मात्र त्याची दखल न घेता प्रस्ताव सापडत नाही अशा स्वरूपाची थातूर मातूर उत्तरे देऊन नवीन प्रकरण करण्यास आरोग्य अधिकारी यांना सांगितले. त्याप्रमाणे पुन्हा उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी यांनी नव्याने प्रकरण दि.३ डिसेंबर २०२० रोजी सादर करून विद्युत कनेक्शन कधी देणार याबाबत विचारणा केली असता आमच्याकडे मीटर शिल्लक नाही अशी सबब महावितरणचे कनिष्ठ अभियंता आव्हाड यांनी करून विद्युत जोडणी करून देण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप आरोग्य विभाग व ग्रामपंचयत विभागाकडून करण्यात आला आहे.

डहाणू उपजिल्हा रुग्णालय पासून २० किलोमीटर आंतरापासून दूर आसलेल्या आदिवासी नागरिकांना आरोग्य सोयी सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना करून त्याठिकाणी एका आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविकेची नेमणूक करून २४ तास ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा उपलब्ध करून दिली जाते.

एकीकडे देशात कोरोणाची दुसरी लाट उंबरठ्यावर असताना पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री नागरिकांना आव्हान करून कोरोनाबाबत उपायोजना सुचवत आहेत तर दुसरीकडे डहाणू महावितरण विभाग मात्र आरोग्य यंत्रणांशी लपंडाव खेळत आसल्याचे निदर्शनास येत आहे.

संपूर्ण कल्याण झोन मध्ये विद्युत मीटरची कमतरता असल्यामुळे नवीन मीटर उपलब्ध नाहीत नवीन मीटर उपलब्ध होताच तात्काळ मीटर जोडणी करण्यात येईल.

अर्थव आव्हाड, कनिष्ठ अभियंता महावितरण , आशागड

महावितरण विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही आंबेसरी आरोग्य केंद्राचा विद्युत पुरवठा एक वर्षाच्या अगोदर पासून जोडणीसाठी टाळाटाळ करत असून विद्युत पुरवठा खंडित आसल्याने रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत तरी विद्युत विभागाने तात्काळ केंद्रास वीज जोडणी करून द्यावी.

संदिप गाडेकर, आरोग्य अधिकारी डहाणू