rain in vikramgad

विक्रमगड(vikramgad) तालुक्यात ८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता तालुक्यात अचानक अवकाळी पावसाच्या जोरदार सरी(rain in vikramgad) बरसू लागल्या. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची तसेच वीट भट्टी मालकांची दाणादाण उडाली.

विक्रमगड:  विक्रमगड(vikramgad) तालुक्यात ८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता तालुक्यात अचानक अवकाळी पावसाच्या जोरदार सरी(rain in vikramgad) बरसू लागल्या. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची तसेच वीट भट्टी मालकांची दाणादाण उडाली. मागच्या एका आठवड्यापासून विक्रमगड तालुक्यात वातावरण ढगाळ व तापमानात चढ-उतार होत आहे. आज १०.३० वाजता अचानक जोरदार पावसाची सुरुवात झाली. साधारण २० मिनिटे सतत पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी साचले. तर नंतर पाऊस थांबला असला तरी वीट भट्टी मालकांचे नुकसान झाले.  शेतकऱ्यांनी लावलेल्या रब्बी पिक भाजीपाला तसेच उडदाचे पिक, तुरीचे पिक हातून जायची वेळ आली आहे. तसेच तिळ व वालाची वाढ खुंटली आहे. त्याची योग्य अशी वाढ झालेेली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मूग,हरभरा, तुर फुलोरा येऊन शेंगा किवा हरभराला घाटया लागल्या आहेत. या कडधान्यां बरोबरच काकडी, कलिंगड, चवळी, वांगी, मिरची,गवार, टाॅमेटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक,आदी या पिकांना ही अवकाळी पाऊसाचा तसेच ढगाळ वातावरणाचा फटका बसणार आहे.