उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे’; आठवलेंची शीघ्र कविता

रिपाइंच्यावतीने आज विक्रमगडच्या दिवेकर वाडी येथे आदिवासी बहुजन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आठवलेंनी शीघ्र कवितेच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

    पालघर : रिपाइच्यावतीने आज विक्रमगडच्या दिवेकर वाडी येथे आदिवासी बहुजन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आठवलेंनी शीघ्र कवितेच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

    राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे, अशा टीकाही त्यांनी कवितेतून केली. पालघर जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

    पालघर तालुक्यात ८ तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. येथे मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही चुकीची बाब असल्याचे आठवले म्हणाले.