झाडाला बांधून महिलेवर बलात्कार; चित्रपटात नाही तर वसईत खरोखर घडलीय अशी घटना

एका महिलेचं अपहरण करुन तिला झाडाला बांधून बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला आहे. कोणत्या चित्रपटात नाही तर वसईत खरोखर अशी घटना घडलेय. या घटनेमुळ वसईत एकच खळबळ उडाली आहे.

    वसई : एका महिलेचं अपहरण करुन तिला झाडाला बांधून बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला आहे. कोणत्या चित्रपटात नाही तर वसईत खरोखर अशी घटना घडलेय. या घटनेमुळ वसईत एकच खळबळ उडाली आहे.

    पीडीत महिलेने या प्रकरणी वालिव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चौघा आरोपींनी या महिलेचे अपहरण केले. यानंतर ते तिला भिवंडीच्या जंगलात घेऊन गेले आणइ तिचा अमानुष छळ केला.

    आरोपींनी महिलेला झाडाला बांधून तिला मारहाण केली. यानंतर तिला विवस्त्र केलं. त्यानंतरही नराधमांचं मन भरलं नाही, त्यांनी महिलेचे केस कापले. त्याशिवाय, या घटनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिल्याचे पोलिसांनी सांगीतले.

    या नंतर आरोपी महिलेला विवस्त्र अवस्थेतच जंगलात सोडून गेले. यानंतर महिलेने पोलिस ठाणे गाठत घडलेल्या घटनेची तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.