जो शहिद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी; शहिदांना वाहण्यात येते श्रद्धांजली

१४ ऑगस्ट १९४२ साली ब्रिटिश राजवटी विरोधात 'चले जावो'चा नारा देत पालघर मधले अनेक तरुण रस्त्यावर उतरले होते. त्यात चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातल्या पाच स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झालं होत. त्यामुळे १४ ऑगस्ट या हा दिवस आज सुद्धा इथं हुतात्मा दिनाच्या रुपात साजरा केला जातो. त्या क्रांति वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी तसचं पुण्यस्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी पालघर चे सर्व व्यापारी आपापली दुकानं बंद ठेवतात.

पालघर : स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी अशा तर  कधीच विसरता येत नाहीत आणि त्यामुळे चं आज ही पालघर चा हुतात्मा चौक जो पाचबत्ती च्या नावानं सुद्धा ओळखला जातो. तो चौक आज सुद्धा लोकांचं लक्ष आपल्या कडे बरोबर वेधून घेतो. इथं आज सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या त्या शहिदांच्या रक्तानं भिजलेल्या झेंड्याला ठेवून त्या शूरवीरांना श्रद्धांजली दिली जाते.

१४ ऑगस्ट १९४२ साली ब्रिटिश राजवटी विरोधात ‘चले जावो’चा नारा देत पालघर मधले अनेक तरुण रस्त्यावर उतरले होते. त्यात चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातल्या पाच स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झालं होत. 

सांगण्यात येत की, १४ ऑगस्ट १९४२ साली  देशाच्या स्वातंत्र्याला घेऊन पालघर च्या तहसील कार्यालयावर ब्रिटिश राजवटी विरोधात चोख बंदोबस्त असताना देखील चले जाव चा मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात पालघर, सातपाटी, मुरबे, नांदगाव, सालवड, तारापूर, घिवली, वडराई, शिरगाव, बोईसर, नवापूर, मनोर, आणि सफाळ्या सह आसपासच्या क्षेत्रातले कैक हजारो लोकं करा किंवा मरा, ब्रिटिशों भारत छोडो आदी नारे देत सहभागी झाले होते. ब्रिटिश पोलिसांनी राम मंदिरा जवळ या मोर्च्याला अडविण्यासाठी आपली पूर्ण ताकत पणाला लावली. मात्र तरी देखील ब्रिटिश पोलीस ह्या मोर्च्यास अडविण्यास असमर्थ ठरल्यानं अखेर त्यांनी मोर्चेकऱ्यांवर गोळीबार करणं सुरू केलं. 

आणि त्या गोळीबारात हुतात्मा चौकाजवळ पालघर चे रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, सालवड चे सुकुर गोविंद मोरे, सातपाटी चे काशीनाथ हरी पागधरे, मुरबे चे रामचंद्र माधव चुरी आणि नांदगाव चे गोविंद गणेश ठाकुर या पाच  क्रांतिकारकांना  १४ ऑगस्ट १९४२ साली दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी हौतात्म्य प्राप्त झालं.

पालघर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेकडे जाताना केवळ दहा पावलांच्या अंतरावर जिथं हे सर्व क्रांतिकारी शाहिद झाले होते त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ एक हुतात्मा स्तंभ बनवण्यात आला आहे. 

ती इतिहासकालीन घटना आज ही सर्वांना लक्षात आहे. आणि म्हणून त्या शुरुवीरांच्या बलिदानाला आठवत दरवर्षी १४ ऑगस्ट ला पालघर मध्ये असलेल्या ( पाचबत्ती चौक ) हुतात्मा स्तंभावर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांकडून, नेत्यांकडून, अधिकाऱ्यांकडून, व्यापाऱ्यांकडून, शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून, पालघर आणि जवळपास च्या नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते.

१४ ऑगस्ट १९४२ च्या चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातल्या या पाच स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झालं होत. त्यामुळे  १४ ऑगस्ट या हा दिवस  आज सुद्धा इथं हुतात्मा दिनाच्या रुपात साजरा केला जातो. त्या क्रांति वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी तसचं पुण्यस्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी पालघर चे सर्व व्यापारी आपापली दुकानं बंद ठेवतात.