In the dark due to increased electricity bill of destitute animals

पाच मीटरमधून पाचशे फ्लॅटला वीज पुरवठा(electricity supply) देणार्‍या बिल्डरने(builder) बील न भरल्यामुळे(electricity bill not paid) ग्लोबल सिटीतील भूमी एक्रोपोलीस सोसायटीतील वीज पुरवठा तोडण्यात आला आहे.त्यामुळे दोन हजारांहून अधिक नागरिकांना तब्बल ३६ तास अंधारात चाचपडत बसावे लागले होते.

  रविंद्र माने, वसई: पाच मीटरमधून पाचशे फ्लॅटला वीज पुरवठा(electricity supply) देणार्‍या बिल्डरने(builder) बील न भरल्यामुळे(electricity bill not paid) ग्लोबल सिटीतील भूमी एक्रोपोलीस सोसायटीतील वीज पुरवठा तोडण्यात आला आहे.त्यामुळे दोन हजारांहून अधिक नागरिकांना तब्बल ३६ तास अंधारात चाचपडत बसावे लागले होते. आश्चर्याची बाब म्हणजे वीजबिलाच्या नावाखाली बिल्डरने रहिवाशांकडून पैसै गोळा केले होते. मात्र ते महावितरणकडे त्याने जमा केले नव्हते.

  विरारच्या पश्‍चिमेला १२५० प्लॅट्ची शानदार भूमी आर्केडची एक्रोपोलीस सिटी आहे.दिसायला चांगल्या असलेल्या या सिटीत अनेक समस्या आहेत.या समस्यांमध्ये शुक्रवारी वीजेची भर पडली.सकाळी १० वाजता येथील वीज पुरवठा खंडीत झाला.शुक्रवारी दुरुस्ती आणि इतर कामांसाठी वसई तालुक्यातील पुरवठा काही काळ बंद करण्यात येतो.त्यामुळे येथील रहिवाशी तसे समजून गप्प बसले होते.मात्र,सायंकाळी उशीरापर्यंत पुरवठा पुर्ववत न झाल्यामुळे सर्वांनी एकमेकांना फोन करून याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.मात्र कोणालाच या बाबत कोणतीच माहिती नसल्यामुळे सर्वजण सोसायटीच्या आवारात जमले.त्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यावर वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन कापण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले.

  रहिवाशांनी बिल्डरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.त्यामुळे दुसर्‍या दिवशीही त्यांना अंधारात रहावे लागले. या सिटीत पंधरा मजल्यांचे टॉवर आहेत.वीज नसल्यामुळे लिफ्ट बंद,पाण्याचे पंप बंद,इंटरनेट बंद अशी परिस्थिती शुक्रवारपासून त्यांच्यावर ओढावली होती.लिफ्ट बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी दवाखाना गाठता आलेला नाही.तसेच पंप बंद असल्यामुळे महिलांना पाणी टंचाईला सामोेरे जावे लागले.वर्क फ्रॉम होम करणार्‍या तरुण-तरुणींना इंटरनेट,मोबाईल,लॅपटॉप रिचार्जच्या समस्यांचा त्यांना सामना करावा लागला.पाचव्या मजल्यावरील सर्व रहिवाशी वरच्यावर अडकून पडले.खाली गेल्यावर सहा ते पंधरा मजले चढण्याची जीवघेणी कसरत टाळण्यासाठी अंधाराचा सामना करणे त्यांनी पसंत केले. सलग तीन दिवस महावितरणाचे कार्यालय बंद असल्यामुळे त्यांना तक्रारही करता आली नाही.बिल्डरशीही त्यांचा संपर्क झाला नाही.

  मेट्रोमधील ५०० फ्लॅटला भूमी आर्केडला ५ मीटरमधून वीज पुरवठा दिला होता.त्या बदल्यात दरमहा बाराशे ते चौदाशे रुपये बिल्डर गेल्या तीन वर्षांपासून वसूल करीत होता. मात्रया वीज बिलांचे पैसे त्याने महावितरणाला दिले नाही.परिणामी थकबाकीदार म्हणून हा पुरवठा खंडीत करण्यात आला. बिल्डर फक्त पाच मीटरमधून पाचशे फ्लॅटला वीज पुरवठा करीत असल्याचे माहित असूनही महावितरणाच्या अधिकार्‍यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  सर्वसामान्य ग्राहकाने आपल्या मीटरमधून अन्य ठिकाणी पुरवठा दिल्यास त्याच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येतो.या ग्लोबल सिटीत मात्र ५ मीटरमधून ५०० फ्लॅटला पुरवठा देण्यात आला होता.त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

  याप्रकरणी महावितरणाचे येथील अतिरुक्त कार्यकारी अभियंता प्रशांत येंगे यांच्याशी संपर्क साधला असता,गेल्या चार वर्षांपासून ही कनेक्शन आहेत.मला इथे येवून ४ आठवडे झाले.त्यामुळे मला काही माहित नाही.त्याबद्दल माहिती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

  दरम्यान भूमी बिल्डरने बील भरल्यामुळे शनिवारी रात्री येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.त्यामुळे येथील रहिवाशांनी अखेर सुटकेचा निश्‍वास सोडला.