rosemary grandmother with dilip prabhawalkar

वसईतील(vasai) रोजमेरी परेरा आजींनी(106 years old woman) वयाची शंभरी पार केली आहे. मात्र आजही त्या काठीच्या आधाराने घरभर फिरतात. महत्त्वाची बाब म्हणजे जागतिक महिला दिन हा त्यांचा जन्मदिन. सांडोरच्या खरभाट गावात त्या ४० जणांच्या( 106 year old woman is head of 40 people family) कुटुंबासह राहतात.

  रविंद्र माने, वसई: तब्बल ४० जणांच्या(106 year old woman head of 40 people family) कुटुंब प्रमुख असलेल्या वसईतील रोजमेरी(rosemary parera) आजींनी नुकतीच वयाची १०६ वर्षे पुर्ण केली आहेत. या वयातही ठणठणीत असणार्‍या या आजींची भेट घेण्याचा मोह ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना आवरता आला नाही. त्यांनीदेखील २ वर्षांपुर्वी रोजमेरी यांची भेट घेतली होती.

  वसईतील रोजमेरी थॉमस परेरा आजींनी वयाची शंभरी पार केली आहे. मात्र आजही त्या काठीच्या आधाराने घरभर फिरतात. महत्त्वाची बाब म्हणजे जागतिक महिला दिन हा त्यांचा जन्मदिन. सांडोरच्या खरभाट गावात त्या ४० जणांच्या कुटुंबासह राहतात.

  वयोमानानुसार रोजमेरी यांचे नजर आणि कान थोडेसे अधू झाले असले तरी शरीराने आणि बुद्धीने त्या १०६ व्या वर्षीही ठणठणीत आहेत.संपुर्ण गोतावळ्याला ती नावानिशी ओळखते.शरीरविधी स्वतःच पार पाडते.दोन्ही वेळा मिस्त्राहार करते.सुतारफेणी व आईस्क्रीम हा तिचा आवडता खाद्य प्रकार आहे.आरोग्यासाठी फक्त रक्तदाबाची अर्धी गोळी आणि देवाची प्रार्थना हा तिचा नित्यक्रम असल्याचे ती सांगते.

  रोजमेरी यांचे पती थॉमस १९८७ ला मरण पावले.एकलुता एक मुलगाही २००७ ला त्यांना सोडून देवाघरी गेला. दोन अविवाहीत मुली,५१ वर्षीय नातु नील आणि नातसुन शर्मीला,पणतु असा मोठा परिवार तिच्या पदराखाली सुखावत आहे.

  घरातील ज्येष्ठांना वृद्धाश्रमात ठेवण्याच्या विचारात असलेल्या पिढीच्या काळात नातु नील आणि शर्मीला रोजमेरीची जातीने काळजी घेत आहेत. अशा या शंभरी ओलांडलेल्या धडधाकट आजीची माहिती मिळाल्यावर तिची भेट घेण्याचा मोह चिरतरुण अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनाही रहावला नाही.त्यांनी दोन वर्षांपुर्वी सांडोर येथील घरी जावून तिची भेट घेतली होती.

  दरम्यान,कोरोनाचा काळ असल्यामुळे रोजमेरी आजीचा वाढदिवस अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला,अशी माहिती नील परेरा यांनी दिली.