bus cheking palghar

महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल बस वर मागील महिन्यात आरटीओकडून कारवाई करत लांबी रुंदी, ओव्हरहँग वाढवून ३६ बर्थ केलेल्या व अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या ट्रॅव्हल बसला लांबी रुंदी कमी करण्याचे निर्देश(order to minimize width and length of bus by rto) देण्यात आले होते.

तलासरी: महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल बस वर मागील महिन्यात आरटीओकडून कारवाई करत लांबी रुंदी, ओव्हरहँग वाढवून ३६ बर्थ केलेल्या व अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या ट्रॅव्हल बसला लांबी रुंदी कमी करण्याचे निर्देश(order to minimize width and length of bus by rto) देण्यात आले होते.

प्रादेशिक परिवहन विभागाने काढलेली १३ फेब्रुवारी २०२० परिपत्रकानुसार खाजगी लक्झरी वाहनांची लांबी रुंदी, ओव्हरहँग वाढवून ३६ बर्थ वापरात असलेल्या वाहनांवर कारवाई करत महाराष्ट्रात प्रवेश बंदी देखील आणण्यात आली होती.शिवाय वाढीव बसेसच्या टॅक्स ही घेण्यात येणार नसल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले होते.मात्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या बहुतांश खाजगी बस मालकांनी अद्यापही नियमानुसार वाहनात बदल केलेला दिसून येत नसल्याने गुजरात महाराष्ट्र सीमेवरील दापचरी सीमा तपासणी नाक्यावर आरटीओकडून रविवार रात्रीपासून वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. यामुळे सीमा तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात लक्झरी बस व प्रवाश्यांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गाने दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रवाशी महाराष्ट्रात दाखल होत असतात. याचाच फायदा खाजगी लक्झरी बसचालकांकडून बेकायदेशीर आसन क्षमता वाढवून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याचे व महाराष्ट्रात अवैध प्रवाशी वाहतूक करीत असल्याचे उघड झाले होते. वाढीव बर्थ, नियम पायदडी तुडवून खाजगी ट्रॅव्हल वाहनाची लांबी रुंदी वाढवून अवैध प्रवाशी वाहतूक करण्यात येत असल्याने अपघातात ही वाढ झाल्याचे निर्दशनास आले होते. त्यामुळे आरटीओकडून या महिन्याचा अखेरपर्यंत ट्रॅव्हल बसमध्ये नियमानुसार करून घेण्याचे निर्देश दिले असून खाजगी बसमध्ये बदल करून घेण्यास सांगण्यात आले आहे.