vehicle checking at maharashtra gujrat borcder

२३ मार्चपासून गुजरात प्रशासनाने नवीन गाईडलाईन्स जाहीर(new guidelines for gujrat) केल्या असून त्यानुसार गुजरातमध्ये प्रवास, प्रवेश करणाऱ्या नागरिकांना ७२ तासांमधील आरटीपीसीआर स्टेट(RTPCR) केलेला रिपोर्ट दाखविल्याशिवाय प्रवेश बंद केला आहे.

    जितेंद्र पाटील, तलासरी : महाराष्ट्रासह(maharashtra) इतर राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असल्याने अनेक राज्यात निर्बंध लावण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवास करत असाल तर सावध व्हा आणि आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडा,असे आवाहन गुजरातसह महाराष्ट्र प्रशासनाने केले आहे. कारण २३ मार्चपासून गुजरात प्रशासनाने नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या असून त्यानुसार गुजरातमध्ये प्रवास , प्रवेश करणाऱ्या नागरिकांना ७२ तासांमधील आरटीपीसीआर स्टेट केलेला रिपोर्ट दाखविल्याशिवाय प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे महामार्गाने गुजरातमध्ये प्रवास करत असाल तर आरटीपीसीआर रिपोर्ट जवळ असेल तर जा अन्यथा माघारी फिरा.

    याशिवाय गुजरात सरकारने आणलेल्या नवीन गाईडलाईनचा फटका महाराष्ट्रातून रोजगारासाठी गुजरातमध्ये जाणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक आदिवासी कामगारांना पडू शकतो. नव्या गाईडलाईनमुळे स्थानिकांच्या रोजगारावर पुन्हा गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    नुकतीच संपूर्ण लॉकडाऊनची २४ मार्च रोजी वर्षपूर्ती झाली असताना कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढीस लागत असल्याचे आढळून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून मास्क वापरण्यासह इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.मात्र नागरिक कोरोना अधिनियमनाला न जुमानता सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत प्रादुर्भाव वाढीस लावण्यास हातभार लावत आहेत. महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या पाहता गुजरात राज्याने महाराष्ट्रातून प्रवास करणाऱ्यांना आरटीपीसीआर स्टेट अहवाल अनिवार्य केला आहे.

    गुजरात महाराष्ट्र सीमेवरील गुजरात राज्यातील भिल्लाड चेक पोस्ट येथे गुजरात पोलिसासह आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून महाराष्ट्रातुन गुजरातमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्याचे स्क्रिनिंग, आरटीपीसीआर रिपोर्ट तपासला जातोय.

    अद्याप याबाबत कडक अंमलबाजवणी सुरू केली नसली तरी उद्यापासून महाराष्ट्र पोलीसांशी चर्चा केल्यानंतर पुढील काही तासांमध्ये कडक अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे गुजरात आरोग्य विभाग आणि महराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना आवश्यकता असल्यास तरच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.आरटीपीसीआरचा ७२ तासातील केलेला रिपोर्ट घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. वर्षभरापूर्वी लॉकडाऊन जाहीर होताच गुजरात महाराष्ट्र सीमेवर मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातील कामगार मोठ्या प्रमाणात अडकून पडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे गुजरात प्रशासनाने नव्या गाईडलाईननुसार अंमलबजावणी सुरू केल्यास वाहनांचा रांगा लागून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तलासरी पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी जिल्हा अधिक्षकाकडे करण्यात आली आहे.