साधू तिहेरी हत्याकांड प्रकरण; सीआयडीकडून डहाणू कोर्टात आरोपपत्र दाखल

पालघर :  पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र – दादरानगर हवेली सीमेलगत असलेल्या गडचिंचले इथं ३ महिन्यांपूर्वी जमावानं २ साधू आणि त्यांचा १ चालक अशा ३ जणांची लाठ्या, काठ्या, दगड, विटा, कोयते अशा शस्त्रांनी मारून हत्या केली होती. या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागनं तपास पूर्ण केला असून डहाणूच्या न्यायालयात ४ हजार ९९५ पानांचं एक तर ५ हजार ९२१ पानांचं दुसरं अशी दोन आरोपपत्र सीआयडीनं दाखल केली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत १६५ जणांना अटक करण्यात आली असून त्यातले ११ जण हे अल्पवयीन असल्यानं त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे.  या हत्याकांड प्रकरणात सीआयडी नं आतापर्यंत ८०८ संशयितांची चौकशी केली असून १०८ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. यात १५४ आणि ११ अल्पवयीन अशा १६५ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत कोणालाही जमीन मंजूर झालेला नाहीये. तर अल्पवयीन ११ आरोपीं विरोधात स्वतंत्र कारवाई होण्याच्या अनुषंगानं बाळ न्याय मंडळ यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे.   

 पालघर जिल्ह्यातल्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादरानगर हवेली आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या गडचिंचले या गावात गुरुवारी 16 एप्रिलला रात्री १० वाजताच्या सुमारास २ साधू आणि त्यांचा १ चालक असे ३ जण आपल्या मारुती इको व्हॅनमधून त्यांच्या गुरूंच्या अंत्यदर्शनासाठी जात असताना ४०० ते ५०० लोकांच्या जमावानं त्यांच्या गाडीला अडवून त्यांना काठ्या ,कुऱ्हाडी, दगड , सळई अशा प्रकारच्या हत्यारांची मारून – मारून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. तर या संबंधित प्रकरणात कासा पोलीस ठाण्यातल्या ३ अधिकाऱ्यांना आणि २ कॉन्स्टेबल अशा ५ जणांना निलंबित करण्यात आलं होतं तर याच कासा पोलीस ठाण्यातल्या ३५ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.     

त्यानंतर वाढत प्रकरण लक्षात घेता राज्य सरकारनं या प्रकरणाचा तपास २१ एप्रिलला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला होता. त्यानंतर लगेचचं २२ एप्रिल ला सीआयडी ची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. काल १५ जुलैला सीआयडीनं या प्रकरणातल्या २ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून गुन्हा घडल्यानंतर ९० दिवसांच्या म्हणजेच ३ महिन्यांच्या मुदतीत डहाणू च्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. या एका घटनेच्या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २ गुन्ह्यांचा तपास सीआयडी नं पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र सादर केलं आहे. तर आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी केलेली फायरींग या उर्वरित १ प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे.     

या प्रकरणी पोलिसांनी कासा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एकाच घटनेच्या पहिल्याच गुन्ह्यात अनेक प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कलम २,३,४,५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम डहाणू न्यायालयात सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिक विजय पवार यांनी दाखल केलं आहे.