javhar school bus
प्रतिकात्मक फोटो

कोरोनामुळे जव्हार तालुक्यात लॉकडाऊन जाहीर झाले आणि शाळा बंद(school shut down) झाल्या. यामुळे स्कूल बस चालक आणि मालक(school bus owners in loss) यांच्या समोर अनेक प्रश्न उभे राहिले.

संदीप साळवे, जव्हार: जव्हार(jawhar) तालुका मूलतः आदिवासी आणि ग्रामीण जिल्हा मुख्य व्यवसाय शेती परंतु केवळ पावसाच्या पाण्यावर होणारी शेती(agriculture), रोजगाराची,आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था यांची प्रचंड वानवा, असे असताना कोरोनामुळे तालुक्यात लॉकडाऊन जाहीर झाले आणि शाळा बंद(school shut down) झाल्या. यामुळे स्कूल बस चालक आणि मालक(school bus owners in loss) यांच्या समोर अनेक प्रश्न उभे राहिले.

जव्हार तालुक्याचा विचार केल्यास जव्हार शहरात सगळीच प्रशासकीय कार्यालये आणि बँका तसेच इंग्रजी शाळा आहेत. तालुक्यातील आणि शहरातील पालकांचा आपला पाल्य इंग्रजी शाळेत शिकावा यासाठी पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे वाढला. शाळेतील मुलांना ने – आणण्यासाठी स्कूल बसची मागणीही वाढली. त्यामुळे शहरातील तसेच तालुक्यातील अनेक युवकांनी कर्ज घेऊन स्कूल बस विकत घेतल्या, स्कूल बसमुळे एक चांगला स्वयंरोजगार उभा राहिला. अनेक युवकांच्या हाताला या माध्यमातून काम मिळाले. सर्व काही अगदी सुरळीत असताना अचानक जागतिक महामारी कोरोनाचे संकट उभे राहिले आणि शाळा बंद झाल्या.

एप्रिलपासून शाळा बंद झाल्यानंतर स्कूल बस सेवादेखील बंद झाली.परिणामी युवकांनी व्यवसाय म्हणून स्कूल बस वाहन खरेदी करण्यासाठी बँकेतून कर्ज घेतल्याने हफ्ते भरणे व्हण दुरुस्ती आणि देखभाल खर्च पाहणे या गोष्टी करत असताना कुटुंबाची जबाबदारी देखील होतीच. कसेबसे आता आठवीपासून राज्यात शाळेचे वर्ग सुरू केले असेल तरी जव्हार तालुक्यातील शाळा कधी सुरू होईल हे अजून गुलदस्त्याच आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रपंच सांभाळणे अधिक कठीण झाले आहे. राज्य शासनानेदेखील स्कूल बस चालक आणि मालकांना काही मदत केली नाही.

जव्हारसारख्या छोट्या शहरात शाळा कमी असल्याने विद्यार्थी संख्यादेखील कमी आहे. शहरात जवळपास २० स्कूल बस आहेत.स्कूल बस बंद असल्याने मालक आणि चालकांसमोर कुटुंबाचे उदरनिर्वाह कसे करावे असे असंख्य प्रश्न उभे आहेत.काही स्कूल बस मालकांना इतर खाजगी वाहनांवर काम करण्याची वेळ आली आहे. काही स्कूल बा चालकांनी तर शेती मजुरी,बांधकाम मजुरी,भाजीपाला व्यवसाय करण्याची देखील वेळ आली आहे.

जव्हार तालुक्यातील सद्यस्थितीत शाळा जरी बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र ऑनलाईन शिक्षण मुलांना घरातून घेत असल्याने स्कूल बस बंद आहेत.स्कूल बस खरेदी करताना कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. तो फेडायचा कसा असा प्रश्न सतत निर्माण होत आहे.शाळा लवकर सुरू व्हावी, हीच प्रार्थना करीत आहे.

- अविन सावंत, स्कूल बस मालक,जव्हार

कोरोनामुळे स्कूल बस बंद असून काही पालकांकडे पैसेही थकीत आहेत. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे सगळ्यांचेच काम धंदे बंद असताना पालक फी देखील देऊ शकत नाहीयेत. त्यामुळे इतर खाजगी गाडी चालवून कुटुंब चालवावे लागत आहे.

- सलमान शेख,स्कूल व्हॅन मालक,जव्हार