prostitute

नालासोपारातील(nalasopara) अर्नाळा(arnala) भागातील शबनम शेख ही महिला फोनवरुन ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार मुली पुरवायची. वेश्या व्यवसाय(prostitutes) चालवून शबनम आपला उदरनिर्वाह करत होती.

    वसई :  फोनवरून चालणारा वेश्याव्यवसाय(prostitute) मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उघड केला आहे.  या प्रकरणी दोन तरुणी आणि एका महिलेला ताब्यात(arrest) घेण्यात आले आहे.

    नालासोपारातील अर्नाळा भागातील शबनम शेख ही महिला फोनवरुन ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार मुली पुरवायची. वेश्या व्यवसाय चालवुन शबनम आपला उदरनिर्वाह करत होती. शबनमच्या या व्यवसायाची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांना मिळाली. ती माहिती सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक बी.एन.पुकळे यांना देण्यात आली.

    मिळालेल्या माहितीवरून खोटे ग्राहक व पंच यांना बोलावून सापळा रचण्यात आला. त्यानंतर खोट्या ग्राहकाने महिला वेश्या दलाल असलेल्या शबनमच्या फोनवर संपर्क साधला. त्याने दोन मुलींची मागणी केली. बोगस ग्राहक नालासोपारा बस डेपो येथे थांबला होता. तेथे महिला दलाल एक १९ वर्षांची आणि एक २३ वर्षांची मुलगी घेऊन आली. ठरलेली रक्कम तिने स्वीकारली. बोगस ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. पुकळे व त्यांच्या पथकाने छापा टाकून ही  कारवाई केली. या कारवाईत एका महिला दलालास अटक करुन २ पीडित मुलींची सुटका करण्यात आली.

    ही कारवाई  पोलीस उपायुक्त ( गुन्हे) डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक बी. एन. पुकळे व पथकाकडून करण्यात आली. अटक आरोपीच्या विरुद्ध नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.