dhanashree plasma doner of palghar

वसई: रुग्णांच्या मदतीसाठी प्लाझ्मादान(plazma donation) करून पालघर जिल्ह्यातील प्लाझ्मादान करणारी पहिली महिला(first woman plazma doner of palghar district) असल्याचा मान नालासोपारातील धनश्री चव्हाण हिने मिळवला आहे.

साथिया ट्रस्ट रक्तपेढीचे चेअरमन विजय महाजन यांच्या आवाहनानुसार धनश्री चव्हाण हिने प्लाझ्मादान केले. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील ती पहिली महिला प्लाझ्मादाता ठरली. तिचा प्लाझ्मादानाचा  निश्चय नक्कीच वाखाणण्याजोगा आहे,असे कौतुक चार वेळा प्लाझ्मादान करणारे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केले.शिवसेना माजी पालघर जिल्हाप्रमुख व धनश्रीचे वडील शिरिष चव्हाण यांनी मुलीचे कौतुक करत प्लाझ्मादान करण्यासाठी आवाहन केले.

रुग्णालयांनी कोविडमुक्त झालेल्या व्यक्तींची यादी करावी जेणेकरून अशा व्यक्तींशी संपर्क साधून प्लाझ्मादान करण्यासाठी त्या व्यक्तीला प्रवृत्त करता येईल,अशी मागणी यानिमित्ताने आमची वसईचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे व साथिया ट्रस्ट रक्तपेढीचे चेअरमन विजय महाजन यांच्या वतीने पालघरचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसाळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.