small treckers of palghar

तांदुळवाडी(tandulwadi) हा ऐतिहासिक किल्ला(historical fort) समुद्रसपाटीपासुन साधारणपणे १९०० फूट उंचीवर आहे. सराईत ट्रेकर्सला हा किल्ला चढून जाण्यासाठी साधारणपणे दिड तास वेळ लागतो. लहान वयात न थकता खडतर दगडातून वाट काढत या चिमुकल्यांनी (small trekkers)अवघ्या २ तासांमध्ये किल्ला सर(trekking) केला.

    नवीन पाटील, पालघर: घनदाट जंगल, वळणा वळणाच्या खडतर आणि तीव्र चढाईच्या पाऊल वाटा, उष्ण वातावरण अशा परिस्थितीत सात ते आठ वर्षांच्या विद्यार्थ्यांनी सफाळे पूर्वेकडील तांदुळवाडीचा अति उंच किल्ला(small children went on tandulwadi fort) फक्त दोन तासांमध्ये(trekking) सर केला आहे.

    जे.व्ही बॅडमिंटन क्लब सफाळे यांच्या वतीने १३ मार्चला या ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. तांदुळवाडी हा ऐतिहासिक किल्ला समुद्रसपाटीपासुन साधारणपणे १९०० फूट उंचीवर आहे. सराईत ट्रेकर्सला हा किल्ला चढून जाण्यासाठी साधारणपणे दिड तास वेळ लागतो. हा किल्ला पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील हजारो पर्यटक तिन्ही ऋतूंमध्ये येत असतात. सफाळे स्टेशनपासून हा किल्ला ७ किलोमीटर अंतरावर आहे.

    लहान वयात न थकता खडतर दगडातून वाट काढत या चिमुकल्यांनी अवघ्या २ तासांमध्ये किल्ला सर केला आणि किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर पोहोचल्यावर मुलांनी शिवाजी महाराजांचा जयघोष करून शिवगर्जना दिली. या ट्रेकिंग मध्ये द्वीप वर्तक , आर्यविर ढाकणे, श्रेयस भालके, राजवीर गायकवाड, आराध्य , वेदांत, धेर्या,समर,आयुष, रूचा, या धाडसी मुला मुलींचा समावेश होता. या ट्रेकिंगसाठी जितेंद्र वर्तक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.