cleaning movement

रविवार म्हटला म्हणजे सर्वांच्याच मौजमजेचा दिवस मात्र हा मौजमजेचा दिवस विनाकारण वाया न घालवता, त्यादिवशी काही सकारात्मक कार्य करून स्वतःला आनंद देण्यासोबत पर्यावरणाचे समतोल(environment balance) टिकून ठेवण्याचे काम सफाळेमधील सर्पमित्रांनी(snake friends) केले आहे.

पालघर : रविवार म्हटला म्हणजे सर्वांच्याच मौजमजेचा दिवस मात्र हा मौजमजेचा दिवस विनाकारण वाया न घालवता, त्यादिवशी काही सकारात्मक कार्य करून स्वतःला आनंद देण्यासोबत पर्यावरणाचे समतोल(environment balance) टिकून ठेवण्याचे काम सफाळेमधील सर्पमित्रांनी(snake friends) केले आहे. या ग्रुपच्या २० ते २५ सदस्यांनी रविवारी तांदुळवाडी घाटातील(tandulwadi ghat) रस्त्यालगतच्या सर्व परिसराची स्वछता करून वन्यप्राणांना पिण्याच्या पाण्याची सोय करून नवीन वर्षातील आपला सुट्टीचा दिवस सत्कारणी लावून नवा आदर्श निर्माण केला आहे.

पालघर जिल्ह्यातील केळवे पर्यटनस्थळी शनिवार, रविवार तसेच इतर सुट्यांच्या दिवशी मुंबई, ठाणे आदी भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मुंबई महामार्गापासून वरईमार्गे हे पर्यटक सफाळे परिसरातील निसर्गरम्य अशा वातावरणाचा आस्वाद घेत, तांदुळवाडी घाटातून प्रवास करतात, मात्र येथून प्रवास करताना पर्यटक थांबल्यावाचून राहत नाहीत. येथील नागमोडी रस्ता जितका धोकादायक आहे, तितकाच तो विलोभनीय असल्याने फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरत नाही. तर दुसरीकडे, या भागात शेकडोंच्या संख्येने माकडं असल्याने ते लहान मुलांचे आकर्षण ठरतात. त्यांना फळे व इतर खाऊ घालण्यासाठी पर्यटकांना एक आगळावेगळा आनंदच मिळतो. मात्र या सर्वांमुळे गेल्या काही महिन्यात घाटातील रस्त्यालगत मोठ्याप्रमाणात प्लास्टिकसह काचेच्या बाटल्या फळांची टरफले आदींचा कचरा होऊन पर्यावरणाचे सौंदर्य भकास झाले होते.

cleaning

यासंदर्भात, उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश उर्फ बंटी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्रांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रविवारी दिवसभर संपूर्ण घाटातील रस्त्यालगत स्वछता मोहीम राबविली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारा कचरा गोणीत भरून सुरक्षित ठिकाणी नेऊन तो जाळण्यात आला. यासोबतच वन्यप्राण्यांना एका मोठ्या टाकीत पिण्यासाठी पाण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.