crime scene

एका तरुणानं आपल्या आईची निर्घृण हत्या (Son Killed Mother) केली आहे. अठरा वर्षांच्या मुलाने आईची हत्या करण्यामागचं कारण समजलं तर तुम्हालाही धक्का बसेल.

    वसई : वसईत ( Crime In Vasai) एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणानं आपल्या आईची निर्घृण हत्या (Son Killed Mother) केली आहे. अठरा वर्षांच्या मुलाने आईची हत्या करण्यामागचं कारण समजलं तर तुम्हालाही धक्का बसेल. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात(Vasai Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    आरोपी तरुण आपल्या आईसोबत वसईच्या कोळीवाडा परिसरातील आयशा अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. तर मृत ५९ वर्षीय महिलेला दारूचं व्यसन होतं. मागील बऱ्याच काळापासून मृत महिला दारूच्या आहारी गेली होती. आपली आई सतत दारुच्या नशेत असते, ही बाब १८ वर्षीय मुलाला पटत नव्हती. यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. मात्र आईचं दारूचं व्यसन काही सुटत नव्हतं.

    मंगळवारी रात्री आई दारूच्या नशेत होती.त्यावरून मायलेकामध्ये पुन्हा वाद झाला. या वादानंतर संतापलेल्या तरुणानं आपल्या आईची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास वसई पोलीस करत आहेत.