strawberry farm

जव्हार मोखाडा(jawhar mokhada) तालुक्यात कृषी अधिकारी अनिल गावित यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून स्ट्रॉबेरीच्या (strawberry farming) उत्पन्नाचा यशस्वी प्रयोग केला आहे. महत्वाची बाब म्हणजे खडकाळ आणि डोंगराळ भागात हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

संदीप साळवे, जव्हार: जव्हार मोखाडा(jawhar mokhada) तालुक्यात कृषी अधिकारी अनिल गावित यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून स्ट्रॉबेरीच्या (strawberry farming) उत्पन्नाचा यशस्वी प्रयोग केला आहे. महत्वाची बाब म्हणजे खडकाळ आणि डोंगराळ भागात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. गावित यांनी जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवले आहे. मोखाडा तालुक्यात ४२ ठिकाणी, तर जव्हार तालुक्यात ४४ ठिकाणी ११ एकर क्षेत्रावर जवळपास २६ हजार स्ट्रॉबेरीच्या झाडांची प्रायोगिक(strawberry farming experiment) तत्वावर लागवड केली आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळणार आहे.

strawberry farming

स्ट्रॉबेरी उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. काही दिवसांमध्येच मुंबई, ठाणे आणि नाशिककरांना जव्हार-मोखाड्याची स्ट्रॉबेरी खायला मिळणार आहे. या लागवडीमुळे आदिवासी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशी आधुनिक पिकांची शेती आपणही करू शकतो असा त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या आधुनिक शेतीमुळे स्थलांतर थांबून आदिवासींचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड
जव्हार आणि मोखाडा तालुक्यात अतिदुर्गम आदिवासी भागातील शेतकरी पारंपरिक नाचणी, वरईची शेती करतात. या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पिके घेतली जात नाही. रोजगार नसल्यामुळे येथे बेरोजगारी वाढली आहे. उपजीविकेसाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंबं शहराकडे स्थलांतर करत आहेत. त्यामुळे काही वर्षांपासून हे तालुके नेहमीच कुपोषण, बालमृत्यूमुळे चर्चेत आले आहेत. मात्र, आता आदिवासी शेतकरी स्वतः आधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यांनी यावेळी चक्क स्ट्रॉबेरीच्या झाडांची लागवड करून आपला आर्थिक स्तर उंचावला आहे. त्यांना या तालुक्यातील कृषी अधिकारी अनिल गावित आणि मंडळ कृषी अधिकारी ऋतुजा कोडलिंगे यांनी मोलाची साथ दिली.

सरकारी अधिकाऱ्यांच्या कृतीशीलतेतून आदिवासी सक्षम
कृषी अधिकारी अनिल गावित यांनी सुरगाणा तालुक्यात मंडळ कृषी अधिकारी असताना त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना एकत्र करून स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी प्रयोग केला होता. आता पालघर जिल्ह्यात जव्हार येथे कृषी अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी जव्हार आणि मोखाडाचं भौगोलिक महत्त्व ओळखलं. हे उंच ठिकाण असून जव्हारला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागात स्ट्रॉबेरीच्या झाडांची लागवड होऊ शकते हे त्यांनी हेरलं. यानंतर त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांना एकत्र करून सापुतारा येथे सहल नेत आदिवासींना स्ट्रॉबेरीच्या झाडांची लागवड करण्याचे प्रशिक्षण दिले.

strawberry
यानंतर आता मोखाडा तालुक्यात ४२ ठिकाणी, तर जव्हार तालुक्यात ४४ ठिकाणी २६ हजार स्ट्रॉबेरीच्या झाडांची प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असून काही दिवसात मुंबई, ठाणे आणि नाशिककरांना जव्हार आणि मोखाड्याची स्ट्रॉबेरी घायला मिळणार आहे. या लागवडीमुळे आदिवासींमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याचे स्थलांतर थांबून आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवले आहे. मोखाडा तालुक्यात ४२ ठिकाणी, जव्हार तालुक्यात ४४ ठिकाणी ११ एकर क्षेत्रावर जवळपास २६ हजार स्ट्रॉबेरीच्या झाडांची प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना शाश्वत ऊत्पन्न मिळणार आहे.

- अनिल गावित,तालुका कृषी अधिकारी,जव्हार,मोखाडा

कृषी अधिकाऱ्यांनी प्रगत शेतीचा मार्ग दिल्याने या आदिवासी भागातील नागरिकांना रोजगारासाठी स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही.तसेच कुपोषण निर्मूलन होण्यास मदत होईल.

- अशोक मोकाशी,लाभार्थी,हिरवे