uriya

डहाणू:  डहाणू(dahanu) तालुक्यात अनुदानित युरिया माफियांचा(uriya black market) उच्छाद सुरू असून याकडे पालघर जिल्हा कृषी विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. युरिया माफियांचे मुख्य केंद्र वाणगाव येथील शेतकऱ्यांच्या वाड्या असल्याचे समोर आले आहे.

डहाणू:  डहाणू(dahanu) तालुक्यात अनुदानित युरिया माफियांचा(uriya black market) उच्छाद सुरू असून याकडे पालघर जिल्हा कृषी विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. युरिया माफियांचे मुख्य केंद्र वाणगाव येथील शेतकऱ्यांच्या वाड्या असल्याचे समोर आले आहे.

पालघर जिल्यामध्ये अनुदानित युरिया घोटाळ्याच्या संदर्भातील काही दिवसांपासून प्रसार माध्यमातून बातम्या प्रसारित होत असताना देखील राज्याचे कृषीमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे व पालघर कृषी विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कारवाई करत नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. कृषी विभाग पालघर यांनी काही दिवसांपूर्वी जिल्यातील अठरा कृषी सेवा केंद्रावर कारवाई करून हात सावरले होते.

राजकारणातील मोठ्या पदावर असलेले लोकनेते, फर्टीलायझर व्यापारी, कृषी सेवा केंद्राचे मोठे व्यापारी या सर्व युरिया माफियांची सक्रिय टोळी जिल्यामध्ये सहभागी असून बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना लाखो टन अनुदानित युरिया काळ्याबाजारात विकला जात आहे.यामध्ये जिल्ह्याबाहेरच्या नेत्यांचाही समाविष्ट असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे .

रात्रीच्या वेळेस हा सर्व खेळ सुरू असून तो डहाणू तालुका,पालघर तालुका, पोलिसांच्या नाकेबंदी दरम्यान सुरळीत प्रवास करून तारापूर बोईसर औद्योगिक वसाहतीमध्ये पोचला जातो. वाणगाव,डहाणू,वाडा,व इतर ठिकाणच्या मोठ्या कृषी केंद्राच्या व्यापाऱ्यांकडून हा पुरवठा युरिया माफियांतर्फे चारोटी, डहाणू असा प्रवास करून वाणगाव दाभले, साखरे, बाडापोखरण येथील युरिया माफियांनी भाडे तत्वावर घेतलेल्या वाड्यामध्ये बेकायदेशीर अनुदानित युरियाची सरकारी गोणी बदलून तो युरिया दुसऱ्या गोणीमध्ये भरून खोट्या दस्तऐवजच्या साह्याने   वाणगाव,पाचमार्ग,बोईसर मार्गे  कारखान्यांना पुरवला जातो. यामध्ये वाणगाव गावाचा वापर मोठ्या प्रमाणात युरिया माफियांकडून केला जातो.

एकीकडे खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी कृषी विभागात प्राप्त झाल्या होत्या.  दुसरीकडे दोनशे ऐंशी रुपये किंमत असलेली युरीयाची गोण बोईसर औद्योगिक कारखान्यांना काळ्या बाजारात पन्नास किलो असलेली गोण बाराशे रुपये पेक्षा जास्त किमतीला  विकली जात आहे. यामध्ये करोडो रुपयचा अवैध धंदा होत असल्याने या प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: दखल घेऊन राज्याच्या वरिष्ठ सनदी अधिकऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.

या युरिया माफियांच्या काळ्या बाजारात जिल्ह्याचे माजी मंत्री असलेल्या वरिष्ठ नेत्यांसह पालघर जिल्हा परिषदेचे आजी माजी काही वरिष्ठ पदाधिकारीदेखील यामध्ये सक्रिय असल्याची खात्रीपूर्वक माहिती वाणगाव येथील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आली आहे.

युरियाच्या काळ्या बाजाराबाबत कृषी विभागामध्ये शेतकरी व सामान्य नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेऊन संबंधित अवैध युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर करवाई होईल. जर साठा शिल्लक असेल आणि कृषि केंद्रे शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा करत नसतील तर त्यांनी तात्काळ कृषी अधीक्षक पालघर अथवा तालुका कृषि कार्यालयात तक्रार द्यावी. अशा केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल.

- काशीनाथ तरक्षे, पालघर कृषी अधीक्षक