आम्ही फ्रंटलाईन वर्कर नाही का? प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाही द्या कोरोनाची लस, शिक्षक संघटनेची मागणी

प्राथमिक शाळेतील शिक्षक(primary school teachers) कोरोना सदृश्य परिस्थितीत इतर फ्रंटलाईन वर्करप्रमाणे(frontline workers) आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनाही तातडीने कोविड लस(demand of corona vaccination) उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    पालघर: पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक(primary school teachers) कोरोना सदृश्य परिस्थितीत इतर फ्रंटलाईन वर्करप्रमाणे(front line workers) आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनाही तातडीने कोविड लस(demand of corona vaccination) उपलब्ध करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पालघर शाखेकडून करण्यात आली आहे.

    कोरोनाच्या लाटेत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना कोविड सेंटरवर कामाची जबाबदारी देण्यात आली होती. या वेळेससुद्धा आपत्ती व्यवस्थापन २४/७ अंतर्गत कोविड सेंटरवर काम करण्याचे आदेश प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांकडून काढण्यात आले आहेत. शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोविड केंद्रांवर काम करताना कोणत्या संकटाचा सामना करावा लागू नये त्यामुळे प्रशासनाने प्राथमिक शाळेची शिक्षकांची काळजी घेणे जरुरीचे असल्याचे म्हटले आहे.

    या आहेत अन्य मागण्या

    शिक्षकांचे कोविड लसीकरण झालेले नाही. त्यांचे लसीकरण करणे जरुरीचे असून ते अगोदर करण्यात यावे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक शिक्षकास विमा कवच मिळणे जरुरीचे आहे. नियंत्रण कक्षेत योग्य तो बदल करण्यात यावा. सलग कामाची जबाबदारी नसावी जेणेकरून कोरोना संपर्कापासून सुरक्षित राहता येईल. पालघरमध्ये ठराविक शिक्षकांनाच कामाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यात बदल करून डहाणू तालुक्याप्रमाणे सर्व क्षेत्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात यावे. आजारी व ५३ वर्षावरील कर्मचाऱ्यांना या जबाबदारीतून वगळण्यात यावे. सेफ्टी पीपीई किट, एन ९५ मास्क या गोष्टी कामाच्या ठिकाणी असताना उपलब्ध करून द्याव्यात. मागच्या वर्षाच्या नियोजनाप्रमाणे दोन शिक्षक व रोटेशन पद्धतीने ड्युटी असावी,अशा मागण्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.

    वर्षभरात जिल्ह्यामध्ये कोरोनाने नऊ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. डहाणू ३, जव्हार २, वसई २, विरार १ व वाडा १ येथील शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.