Terrible accident near Dahanu on Ahmedabad National Highway

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणू येथील चारोटी उड्डाणपुलावरील वळण अपघातासाठी हॉटस्पॉट बनले आहे. याच धोकादायक वळणावर मुंबईच्या दिशेने जात असताना रविवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास फिल्मी स्टाईलने बाईक चालवणारा रायडरचा धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने अपघात झाला आहे.

डहाणू : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणू येथील चारोटी उड्डाणपुलावरील वळण अपघातासाठी हॉटस्पॉट बनले आहे. याच धोकादायक वळणावर मुंबईच्या दिशेने जात असताना रविवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास फिल्मी स्टाईलने बाईक चालवणारा रायडरचा धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने अपघात झाला आहे.

बाईक उड्डाणपुलाच्या कठड्याला ठोकून खाली पडली व डोक्याला गंभीर मार लागल्याने सिद्धेश परबचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेल्या सुनील यादव (२४) याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. सिद्धेश परब (२२) हा नेहमीप्रमाणे रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून बाईक रायडिंगसाठी मुंबईवरून वापीच्या दिशेने निघाला होता.

पुन्हा मुंबई महामार्गावरील घराच्या दिशेने निघालेल्या या बाईक रायडरचा दुःखद मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काही अंतरावर महालक्ष्मी महालक्ष्मी ते आंबोली दरम्यान आणखी एका बाई रायडरचा मोनीष राऊत (38, रा. पालघर) याचादेखील अपघातात मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या अपघाताची मालिका कायम सुरूच आहे.

महामार्ग प्राधिकरण विभाग मात्र या सर्व बाबींकडे कानाडोळा करत आहे. चारोटी उड्डाणपूलावर धोकादायक असल्यामुळे त्या ठिकाणी वाहन चालक आनंदा घेत नसल्यामुळे अपघातात वाढ होत आहे लवकरच मार्ग प्राधिकरण विभागाने यावर ठोस उपाय योजना करावी अशी वाहनचालक मागणी करीत आहेत.

प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या रविवारी बाईकस्वरांची फिल्मी स्टाईलने मोठ्या संख्येने भरधाव वेगात बाईक रायडींग करत असतात. यामध्ये मोठ्या संख्येने श्रीमंत घरातील मुलांचा समावेश असतो. हे बाईक रायडर १२० ते १४० किमी प्रति तास या वेगात आपले वाहने धूम स्टाईलने पळवीत असतात.