आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत असहकार्याचं वातावरण खपवून घेतलं जाणार नाही – डॉ. कैलास शिंदे

आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना काम करावं लागतं. मात्र काही वेळेस नागरिकांकडून या कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक केली आहे. त्यांना अनेकदा अपमानास्पद वागणूक तर काही वेळेस मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याऐवजी जर असं असहकार्याचं वातावरण तयार केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिला.

पालघर: कोरोना संकटाच्या काळात आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करत असून ग्रामपातळीवर अशा आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना काम करावं लागतं. मात्र काही वेळेस नागरिकांकडून या कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक केली आहे. त्यांना अनेकदा अपमानास्पद वागणूक तर काही वेळेस मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याऐवजी जर असं असहकार्याचं वातावरण तयार केल्यास  त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिला. 

आपल्या गावात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी चाचणी करण्यासाठी येतात त्यावेळी संशयित रुग्ण आहेत त्यांनी पुढे येऊन स्वतःहून चाचणी केली पाहिजे. जेणेकरून जास्तीत जास्त रुग्ण सापडतील. त्यांच्या जीवितास होणारा संभाव्य धोका टाळता येईल. परंतु यात जर नागरिक अडथळा आणत असतील तर त्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे अशा सूचना ही जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिल्या आहेत.