knives

वसई : दुकानदाराने उधारीवर सामान दिले नाही म्हणून ग्राहकाने त्याच्यावर चाकी हल्ला केल्याचा धकाकादायक घटना वसईत घडली आहे. यात दुकान मालक जखमी झाला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

वसई पूर्व परिसरात ही घटना घडली आहे. विजय कल्याण वालीया (वय ३४ वर्षे) असे या घटनेत जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे.
एक व्यक्ती त्याच्या दुकानत सामान खरेदी करण्यासाठी आला होता.

यावेळी या ग्राहकाने विजयकडे उधारीवर सामान मागीतले. मात्र, विजयने यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या ग्राहकाने त्याला शिवीगाळ केली. यानंतर त्याने त्याच्यावर चाकुने हल्ला केला. यात विजय गंभीर जखमी झाला आहे.