Rail Rocco agitation

मुंबईकडे येणारी सौराष्ट्र एक्सप्रेस पालघरमध्ये पहाटे ५वाजून ५ मिनीटांनी पालघरला पोहचते. परंतु ह्या एक्सप्रेसचा वेळात बदल करुन ती पहाटे २.४५ वाजता पालघरमध्ये दाखल होणार होती. यानंतर पालघर येथून पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी पहिली लोकलही रद्द केली.

पालघर : पालघर (palghar), डहानूकडून मुंबईकडे येणारी पहिली लोकल बंद करण्यात येणार असल्याने आणि सौराष्ट्र एक्सप्रेसचा वेळ बदलण्यात येणार असल्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही माहिती प्रवाशांना मिळाल्यावर संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले. या वेळी मोठ्या प्रमाणात प्रवाशी रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन (Rail Roco agitation) करत होते. या आंदोलनामुले पश्चिम मार्गावरील रेल्वे (Western Railway traffic ) वाहतूक कोलमडली आहे.

मुंबईकडे येणारी सौराष्ट्र एक्सप्रेस पालघरमध्ये पहाटे ५वाजून ५ मिनीटांनी पालघरला पोहचते. परंतु ह्या एक्सप्रेसचा वेळात बदल करुन ती पहाटे २.४५ वाजता पालघरमध्ये दाखल होणार होती. यानंतर पालघर येथून पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी पहिली लोकलही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला ही माहिती मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कळताच त्यांचा संताप अनावर झाला.

मुंबईकडे पहाटेच्या वेळी रवाना होणाऱ्या प्रवाशांटी गैरसोय होणार असल्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरुन पालघर स्थानकातून सोडण्यात आलेली रेल्वे रोकून धरली. परंतु ती लोकल केळवे स्थानकात सायडिंगला काढण्यात आली. आणि मुंबईच्या दिशेने राजधानी एक्सप्रेसला पुढे सोडण्यात आले. यामुळे प्रवशांत संतापाची लाट उसळली त्यामुळे दोन्ही ट्रॅकवर उतरले. प्रवाशांनी केलेल्या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद झाली होती.

संपूर्ण रेल्वे वाहतूक बंद पडल्याने रेल्वे सुरक्षा दल, पोलीस यांनी दोन्ही स्थानकात धाव घेतली. पालघर रेल्वे स्टेशन मास्तरांना प्रवाशांच्या मागण्याचे निवेदन दिले आहेत. हे निवेदन मुंबई सेंट्रलला पाठविण्याचे व तेथे जाऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रवाशांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.