The earthquake affected Dahanu and Talasari area in palghar
डहाणू आणि तलासरी भागात अजून ही भूकंपाचे धक्के सुरूच

  • नागरिकांमध्ये सतत होणाऱ्या भूकंपामुळे भीतीचे वातावरण

तलासरी : पालघर (Palghar) जिल्ह्यात डहाणू (Dahanu) आणि तलासरी (Talasari) भागात रात्रीच्या सुमारास पाच मोठे भूकंपाचे (earthquake) धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के डहाणू आणि तलासरी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात जाणवले असल्याची माहिती  त्यांनी दिली आहे.

आज पहाटे ०३:३० मिनिटांनी एक भूकंपाचा मोठा धक्का बसला. हे भूकंपाचे धक्के डहाणू आणि तलासरी तालुक्यातील गावांना बसलेले आहेत, दुसरा धक्का ०३:४३ वाजून मिनिटांनी, तिसरा परत लगेच पाठोपाठ, चवथा ०३:५६ मिनिटांनी, आणि पाचवा ०३:५८ मिनिटांनी असे लगातार भूकंपाचे धक्के बसले, त्यामुळे डहाणू आणि तलासरी भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी किंवा कुणाचेही नुकसान झाले नाही अशी माहिती सांगण्यात येत आहे. मात्र, डहाणू तलासरी भागात सतत होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे येथील नागरिक भीतीच्या वातावरणात असल्याचे दिसून येत आहेत, या रात्रीच्या भूकंपाच्या धक्क्याने इथल्या नागरिकांनी भितीने रात्र जागून काढली आहे.

पालघर जिल्हातील डहाणू आणि तलासरी भागात एकीकडे पाऊस पडतोय तर दुसरी कडे वीजा पडून नागरिकांचा जीव जातोय अशातच भूकंपाचे धक्केही दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे नागरिक अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेले असल्याचे सांगण्यात येत आहे.