खंडोबा महाराज
खंडोबा महाराज

महाराष्ट्राचे एक जुने मुकणे राजांचे संस्थान, आदिवासी दुर्गम तसेच डोंगर दऱ्यांचा भाग म्हणून ओळखला जाणारा पालघर जिल्ह्यातील जव्हार हे शहर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. याच शहरात धाकटी जेजुरी म्हणून उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले श्री खंडोबा महाराजांचा उत्सव मार्गशीर्ष शु. ६, रविवारी दिनांक २० डिसेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्त भव्य प्रमाणात दुपारी ४ वाजता, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन पालखीचे आणि श्रीखंडेराव महाराजांची घोड्यावरुन मिरवणूक निघणार आहे.

जव्हार (Javhar).  महाराष्ट्राचे एक जुने मुकणे राजांचे संस्थान, आदिवासी दुर्गम तसेच डोंगर दऱ्यांचा भाग म्हणून ओळखला जाणारा पालघर जिल्ह्यातील जव्हार हे शहर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. याच शहरात धाकटी जेजुरी म्हणून उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले श्री खंडोबा महाराजांचा उत्सव मार्गशीर्ष शु. ६, रविवारी दिनांक २० डिसेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्त भव्य प्रमाणात दुपारी ४ वाजता, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन पालखीचे आणि श्रीखंडेराव महाराजांची घोड्यावरुन मिरवणूक निघणार आहे.

खंडोबा मंदिराचे ऐतिहासिक महत्व
शिव आणि शक्तीचे प्रतिक म्हणजे श्रीखंडोबाराया ! शिवाची आणि शक्तीची भक्ती करणे हे तर खऱ्या शूरवीरांचे लक्षण. इतिहासात ज्या ज्या राजसत्ता उभ्या राहिल्या आणि संस्थाने प्रस्थापित झाली त्यामागे अधिष्ठान होते. ते राजघराण्याच्या कुलदैवतेचे आणि राजगुरूंचे. जयबा राजांच्या संस्थानच्या नांवातच जय आणि हर होते. जयहर अर्थात जव्हार ! जव्हार संस्थानची रणगर्जना होती हर हर महादेव ! म्हणजेच जय मल्हार ! जय मल्हार !! जव्हार राज्याचे जे चिन्ह होते त्यात जय मल्हार या नावाचा उल्लेख अग्रभागी होता. जव्हार राजघराण्याची श्री मल्हारी मार्तंडावर अपार श्रद्धा आहे. त्या श्रद्धेतून आणि जेजुरीच्या खंडेरायाच्या दृष्टान्तातून जव्हारला श्रीखंडोबारायाचे मंगलमय मंदिर उभे राहिले.

जव्हार राज घराण्याचे कुलदैवत म्हणून या स्थानाला महत्व प्राप्त झाले होते. संस्थानि आमदानीत जव्हार चंपाषष्टीची फार मोठी यात्रा भरत असे. या यात्रेस नाशिक,इगतपुरी,घोटी,देवळाली आदी भागातून अनेक भाविक येत असतात. जेजुरी या खंडेरायाच्या मुख्यास्थानी ज्या भाविकांना दर्शनासाठी जाने शक्य होत नसे.असे अनेक भाविक जव्हार येथील धाकटी ”जेजुरी” येथे दर्शनासाठी येत असतात. जव्हारचे राजे चवथे पतंगशाह यांच्या मातोश्री कै.राणी लक्ष्मीबाई या जेजुरीच्या रामजी चव्हाण या मराठा्च्या कन्या त्यांचे माहेरचे नाव मुक्ताबाई. मुक्ताबाई यांचे उपास्य दैवत ”खंडोबाराया” असल्याने या दैवताचे मंदिर जव्हार येथे सुद्धा बांध, असा आदेश त्यांनी आपला मुलगा राजे ४थे पतंगशाह यांना दिला. जेजुरी सारखेच कडेपठार असलेल्या स्थानावर सूर्य तलावाशेजारी शांत व प्रसन्न जागा निवडून ४ थे पतंगशाह यांनी जव्हार येथील मंदिर बांधले.