डोंगर माथ्याची वाट तुडवत खासदार पोहचले त्या आदिवासी पाड्यांवर

२५ ते ३० किमी अंतरावर डोंगर दरी खोऱ्यात वसलेले दखण्याचापाडा वडपाडा उंबरपाडा मनमोहाडी भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे आजही सोयीसुविधा पासून कोसो दूर आहेत स्वातंत्र्याची ७० वर्ष उलटूनही अद्याप या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्याचा सामना करावा लागत असून रस्त्या अभावी अबाल वृद्ध गरोदर माता शाळकरी मुले (School Students) चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

मोखाडा: मुबंई (Mumbai) पासून १०० किमी अंतरावर व जव्हार (Jawahar) पासून २५ ते ३० किमी अंतरावर डोंगर दरी खोऱ्यात वसलेले दखण्याचापाडा वडपाडा उंबरपाडा मनमोहाडी भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे आजही सोयीसुविधा पासून कोसो दूर आहेत स्वातंत्र्याची ७० वर्ष उलटूनही अद्याप या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्याचा सामना करावा लागत असून रस्त्या अभावी अबाल वृद्ध गरोदर माता शाळकरी मुले (School Students) चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच आजारी पेशंट झाल्यास लाकडाची डोली करून ७ किमीचा भलामोठा डोंगर तुडवत झाप येथील आरोग्य पथक गाठावे लागते परंतु वेळीच उपचार न मिळाल्याने येथील अनेक पेशंट दगावले देखील आहेत परंतु या समस्यांची खासदार राजेंद्र गावित यांनी गंभीरतेने दखल घेतली असून ३० सप्टेंबर रोजी या पाड्याना भेट दिली व येथील परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून हा रस्ता पुढच्या वर्षापर्यंत करणार असल्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर येथील आदिवासींना रोजगाराच्या सुविधा देेेखील उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले तसेच वनविभागावाकडून या रस्त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे डीएफओ अमित मिश्रा यांनी सांगितले.

यावेळी डी एफओ अमित मिश्रा तहसीलदार बाळा भला गटविकास अधिकारी समीर वठारकर अमोल चौधरी (सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता जव्हार) पवार रावसाहेब सार्वजनिक बांधकाम विभाग एकनाथ दरोडा (अध्यक्ष युवा बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका) आदी पदाधिकारी उपस्थित होते व या गावापड्याना भेट देऊन येथील रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदारांनी आश्वासन दिल्याने येथील आदिवासीनी गावितांचे आभार मानले.