पालघर जिल्ह्यातल्या कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांची संख्या वाढली ; आज दिवसभरात ७ नव्या रुग्णांची  नोंद

पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना पोझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भरच पडत चालली आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढतचं चालली असून शनिवारी ( २५ एप्रिल ) ला संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारी नुसार आज

पालघर  : पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भरच पडत चालली आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढतचं चालली असून शनिवारी ( २५ एप्रिल ) ला संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारी नुसार आज जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची संख्या वाढून १३० वर पोहचली आहे. तर १३० पैकी १० जणांचा मृत्यु झाला आहे.

 

जिल्ह्यातल्या कोणत्या भागात किती कोव्हिड १९ रुग्ण :

जिल्ह्यात आजच्या घडीला एकूण १३० कोव्हिड १९ चे रुग्ण आहेत. त्यापैकी पालघर त्यालुक्यतले ११ रुग्ण असून १ जणाचा मृत्यु झाला आहे. डहाणु तालुक्यात ८ रुग्ण आहेत. वसई ग्रामीण मध्ये १ तर उर्वरित ११० रुग्ण हे वसई विरार क्षेत्रातले असून १० जणांचा  मृत्यु झाला आहे.  

पालघर जिल्हा कोरोना अपडेट :

जिल्ह्यात एकूण रुग्ण – १३० ( १० मृत्यु )

वसई तालुका( वसई  विरार महानगरपालिका क्षेत्र ) – ११० ( ९ मृत्यु )

पालघर तालुका – ११ ( १ मृत्यू )

डहाणू तालुका – ८ 

वसई ग्रामीण – १

अजुन जिल्ह्यातल्या ५७३ जणांचे तपासणी अहवाल येने बाकी आहेत. तर ३७ जणांना घरी सोडण्यात आलं आहे.