शिक्षकाने स्वतःचे चित्र काढून लिहली मृत्यू दिनांक, आत्महत्या करुन संपविले जीवन

  • गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात विविध घटना समोर येत आहे. तसेच पालघरमध्ये देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने स्वतःचे चित्र काढून त्यावर मृत्यू दिनांक लिहून आत्महत्या केली आहे. जन्म दिनांक लिहिल्यानंतर फोटाला त्यांनी हारही घातला आहे.

पालघर – जगभरात कोरोनाच संसर्ग वाढू लागल्याने देशात कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. हा लॉकडाऊन तीन महीने राहिला. त्यामुळे अनेक परप्रांतीय आपल्या घराकडे जायला निघाले यात काहींनी आपला जीव गमवला आणि इतर मजूरांचा अपघाती मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे घरात कोंडून राहिल्याने उपासमारी झाली. यामुळे अनेक नागरिक नैराश्येत येवून आपले जीवन संपवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात विविध घटना समोर येत आहे. तसेच पालघरमध्ये देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने स्वतःचे चित्र काढून त्यावर मृत्यू दिनांक लिहून आत्महत्या केली आहे. जन्म दिनांक लिहिल्यानंतर फोटाला त्यांनी हारही घातला आहे. 

काय आहे प्रकरण 

शिक्षकाचा लग्नास ५ वर्ष झाले तरी वेतन मिळत नसल्याने कंटाळलेल्या पत्नीने घर सोडून माहेर गाठले. यामुळे मयत शिक्षक अस्वस्थ आणि विचलित अवस्थेत होता. आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव गंगाराम आसे आहे. गंगाराम उत्तम चित्रकार होता. त्याला वारली चित्रकलेची फार आवड होती. त्यात तो पारंगतही होता. या चित्रकाराने ८ जून रोजी आपले स्वतःचे चित्र काढले आणि त्यावर १५ जूले २०२० अशी मृत्यू दिनांक टाकली आणि सर्व नातेवाईकांना तो फोटो पाठविला. 

पावसामुळे शेतीची कामे जोमाने सुरु असल्याने घरातील मंडळी शेतात गेली होती. गंगाराम घरी एकटाच होता. त्यातच त्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. गंगाराम चौधकी विनाअनुदानित शाळेवर चित्रकला शिक्षक होते. नैराश्येमुळे आत्महत्या केल्याचे समजते आहे.