Arrest

सफाळे येथील प्रसिद्ध कोळंबी उद्योजक अजित  पाटील यांच्या वेढी येथील कोळंबी प्रकल्पातून भरदिवसा मासे चोरी(fish theft) करण्यात आली. ही मासेचोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले आहे.

    पालघर: पालघर(Palghar) तालुक्यातील सफाळे येथील प्रसिद्ध कोळंबी उद्योजक अजित  पाटील यांच्या वेढी येथील कोळंबी प्रकल्पातून भरदिवसा मासे चोरी करण्यात आली. ही मासेचोरी करणाऱ्या तिघांना रंगेहात पकडुन सफाळे पोलिसांनी या तिघांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ४ हजार रुपयांच्या मासे(fish theft) तसेच डिस्को जाळी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

    सफाळे वेढी जलसार या खारटन जमिनीत अजित पाटील यांच्या ३५० हेक्टर जमिनीत कोळंबी प्रकल्प आहेत. यापैकी वेढी गावातील प्रकल्पामध्ये २ मे रोजी सकाळी ९:०० वाजता बिपीन कारभारी( वय – ३२), जयेश कारभारी(वय -२९), विकास  किणी (वय – ४२)  या वैतीपाडा येथे राहणाऱ्या तिघांनी चोरीच्या मार्गाने जाऊन वेढी गावातील प्रकल्पामधून डिस्को जाळीच्या सहाय्याने या प्रकल्पातील ४ हजार रुपयांचे मासे चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरी करुन पळण्याच्या प्रयत्नात असताना सफाळे पोलिसांनी या तिघांना रंगे हात पकडले. या तिघांकडून ४ हजार रुपयांच्या मासे तसेच डिस्को जाी असा मुद्दे माल जप्त करण्यात आला. या तिघांवर सफाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी गुन्हे दाखल करून अटक केली आहे.