कर्जाच्या डोंगरातून मुक्तता होण्यासाठी त्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव, पोलिसांनी केला पर्दाफाश

कर्जबाजारी झाल्यामुळे स्वतःच्या अपहरणाचा(plan of kidnapping) बनाव एका तरुणाने केल्याची घटना वसई (vasai police)पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.

    रविंद्र माने, वसई : कर्जबाजारी झाल्यामुळे स्वतःच्या अपहरणाचा(plan of kidnapping) बनाव एका तरुणाने केल्याची घटना वसई (vasai police)पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.

    नालासोपारा पूर्वेकडील धानिव बाग येथे राहणारे मुजिमुल्ला खान यांचा मेव्हणा इस्तेकार खान (वय २४) हा औषध आणण्यासाठी वसईतील डीएम पेटीट सरकारी रुग्णालयात गेला होता.त्यावेळी पोलीस आणि डॉक्टरांचे ड्रेस घातलेल्या चार इसमांनी त्याचे अपहरण केले.एक लाख वीस हजार रुपये पाठवल्या नंतरच त्याला सोडण्यात येईल असे त्यांनी मोबाईल वरून धमकावले होते.

    मुजिमउल्ला खान यांनी वसई पोलीस ठाणे गाठून अपहरणाची आणि खंडणीची तक्रार नोंदवली.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वसई पोलिसांनी इस्तेकार खान याचा फोटो मिळवून तपास सुरू केला. त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली.

    त्यातील एका पथकाने नालासोपारात तर दुसऱ्या पथकाने गिरगाव, सांताक्रुझ, घाटकोपर, अंधेरी येथे तांत्रिक माहिती आधारे शोध सुरू केला.त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसे,सहाय्यक पोलीस निरीक्षक नलावडे, आणि पोलीस शिपाई अमोल पाटील यांच्या पथकाला इस्तेकार खान हा नारायण नगर घाटकोपर येथील मॉल समोर सापडला.

    त्याला विश्वासात घेऊन या पथकाने चौकशी केली असता इस्तेकार खानने अपहरणाचा बनाव उघड झाला.कर्जबाजारी झाल्यामुळे एक लाख वीस हजार रुपये मिळवण्यासाठी हा बनाव त्याने केला होता.त्याचा हा अपहरणाचा बनाव परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील,सहायक पोलीस आयुक्त प्रदीप गिरीधर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांच्या पथकाने अवघ्या बारा तासात उघडकीस आणला.